

sticky bomb
ESakal
सोमवारी संध्याकाळी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अकरा जणांचा मृत्यू झाला आहे. एलएनजेपी रुग्णालयात २४ हून अधिक जखमींवर उपचार सुरू आहेत. अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. स्फोटानंतर अनेक वाहनांना आग लागली. हा स्फोट संध्याकाळी ६:३२ च्या सुमारास झाला. वाहन लाल दिव्याजवळ उभे होते.