कोरोनाचा बूस्टर डोस मिक्स अँड मॅच स्वरुपाचा असणार? आरोग्य मंत्रालयाने दिलं उत्तर

vaccination
vaccinationesakal

नवी दिल्ली : आरोग्य मंत्रालयाने कोरोना परिस्थितीसंदर्भात पत्रकार परिषद घेत देशातील कोरोना स्थितीबाबत माहिती दिली आहे. सध्या देशातील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक असून जगभरात काय स्थिती आहे तसेच ओमिक्रॉन व्हेरियंटसंदर्भात कशी खबरदारी घ्यायला हवी, याचीही माहिती देण्यात आली आहे. भारतात सध्या Precautionary कोरोना डोसची चर्चा सुरु असून नेमका कोणता डोस मिळणार आहे, याचीही माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 60 वर्षे वयावरील लोकांना 10 जानेवारीपासून हा Precautionary डोस देण्यात येणार आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात आतापर्यंत ओमिक्रॉनच्या व्हेरियंटमुळे तब्बल 108 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

vaccination
मी जिवंत परतू शकलो; मुख्यमंत्र्यांना आभारी आहे म्हणून सांगा; PM मोदींचा खोचक टोला

कसा असेल कोरोनाचा बूस्टर डोस?

येत्या 10 जानेवारीपासून कोरोनाच बूस्टर डोस देण्या येणार आहे. Precautionary कोरोना डोस (Precautionary COVID-19 vaccine dose) हा पूर्वी दिलेल्या लसीचाच असेल. ज्यांना Covaxin मिळाले आहे त्यांना Covaxin मिळेल, ज्यांना Covishield चे प्राथमिक दोन डोस मिळाले आहेत त्यांना Covishield मिळेल, असं नीती आयोगाचे सदस्य डॉ व्ही के पॉल (Dr VK Paul) यांनी स्पष्ट केलंय.

सध्या भारतात 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरणास सुरुवात झाली असून भारतातील 15 ते 18 वयोगटातील सुमारे 7.40 कोटी मुले ही कोरोना लसीकरणासाठी पात्र आहेत, अशी माहितीही देण्यात आली आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, झारखंड, गुजरात ही काही चिंतेची राज्ये आहेत ज्याठिकाणी कोरोना प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. देशातील 28 जिल्हे असे आहेत जिथे 10% पेक्षा जास्त weekly positivity दिसून येत आहे. भारतात गेल्या 8 दिवसांत रुग्णांमध्ये 6.3 पटीने वाढ झाली आहे. 29 डिसेंबर 2021 रोजी केस पॉझिटिव्हीटी ही 0.79% वरून 5 जानेवारी रोजी 5.03% पर्यंत वाढली आहे, असं आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलंय.

vaccination
'पंतप्रधानांसोबत खेळ खेळताय', मोदींचा ताफा रोखल्यानंतर पाटील आक्रमक

4 जानेवारी रोजी जागतिक स्तरावर 25.2 लाख प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ही आकडेवारी कोरोना महामारी सुरू झाल्यापासून आतापर्यंतची सर्वाधिक आहे. 4 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात अंदाजे 65% प्रकरणे यूएसए, यूके, फ्रान्स, इटली आणि स्पेनमधून नोंदवली गेली आहेत. ओमिक्रॉन हा देशातील शहरांमध्ये वाढत असून त्यामुळे चिंता वाढली आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटच्या प्रसाराचा वेग कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सभा आणि मेळावे टाळावेत, अशी सूचना आयसीएमआरचे प्रमुख डॉ बलराम भार्गव (Dr Balram Bhargava) यांनी दिली आहे.

Omicron डिटेक्ट करणारे RT-PCR किट टाटा MD आणि ICMR यांच्या भागीदारीमध्ये विकसित केलं गेलंय. आणि त्याला DCGI नेही मान्यता दिली आहे. हे किट चाचण्यांचा 4 तासांत निकाल देईल, अशीही त्यांनी माहिती दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com