VVPAT : सुप्रीम कोर्टाच्या निकलानंतर ‘व्हीव्हीपॅट’ पुन्हा चर्चेत! कुठे? कधी? अन् का? सुरू झाला वापर, जाणून घ्या सर्वकाही

Supreme Court Verdict on VVPAT : निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता यावी तसेच सर्वसामान्य मतदारांमध्ये विश्वासार्हता निर्माण व्हावी या उद्देशाने ‘व्हीव्हीपॅट’चा वापर सुरू झाला होता.
what is VVPAT know its history Supreme Court Verdict on VVPAT Marathi news
what is VVPAT know its history Supreme Court Verdict on VVPAT Marathi news

नवी दिल्ली : साधारणपणे अकरावर्षांपूर्वी निवडणूक प्रक्रियेमध्ये वापर सुरू झालेली ‘व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल मशिन (व्हीव्हीपॅट) सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता यावी तसेच सर्वसामान्य मतदारांमध्ये विश्वासार्हता निर्माण व्हावी या उद्देशाने ‘व्हीव्हीपॅट’चा वापर सुरू झाला होता.

.......
वापरासाठी : ‘निवडणूक नियम-१९६१’ मध्ये २०१३ मध्ये सुधारणा करण्यात आली
येथे प्रथम वापर : नोकसेन विधानसभेची पोटनिवडणूक (नागालँड)
......
एका ‘ईव्हीएम’साठी : एक बॅलेट युनिट, एक कंट्रोल युनिट आणि एक व्हीव्हीपॅट

एका ईव्हीएमचा अंदाजे खर्च
- बॅलेट युनिट ः ७ हजार ९००
- कंट्रोल युनिट ः ९ हजार ८००
- व्हीव्हीपॅट ः १६०००
......

what is VVPAT know its history Supreme Court Verdict on VVPAT Marathi news
Supreme Court Verdict on VVPAT : कोर्टाचा निकाल विरोधकांना थप्पड! ‘व्हीव्हीपॅट’वरून पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

तफावत आढळली नाही
साधारणपणे २०१९ पासून निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता यावी यासाठी निवडणूक आयोगाने एखादा विधानसभा अथवा लोकसभा मतदारसंघातील सरसकट निवडण्यात आलेल्या पाच मतदान केंद्रांवरील ‘ईव्हीएम’मधील मतांशी ‘व्हीव्हीपॅट’च्या पावत्यांची पडताळणी करणे सुरू केले होते. आतापर्यंतचा इतिहास लक्षात घेता कोठेही दोन्हींमध्ये फारशी तफावत आढळून आलेली नाही.

what is VVPAT know its history Supreme Court Verdict on VVPAT Marathi news
Supreme Court : बॅलेट पेपरबाबतच्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या; EVM वरच होणार मतदान

अशीही प्रक्रिया
मतदाराने बॅलेट युनिटवर एखाद्या उमेदवारास मतदान केल्यानंतर त्या मतदारास ‘व्हीव्हीपॅट’च्या स्मॉल विंडोमध्ये तो उमेदवार आणि पक्षाचे चिन्ह सात सेकंदांच्या कालावधीसाठी पाहायला मिळते त्यानंतर त्याची स्लीप शेजारच्या बास्केटमध्ये पडते. गोपनीय मतदान पद्धतीमुळे मतदारास व्हीव्हीपॅटची स्लीप घरी नेता येत नाही.

- मतदानापूर्वी : ईव्हीएम, व्हीव्हीपॅट ४५ दिवस स्ट्राँग रुममध्ये ठेवल्या जातात

४५ दिवस सुरक्षित ठेवले जाते
निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कुणीही त्याला ४५ दिवसांच्या अवधीमध्ये उच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतो ही बाब लक्षात घेऊन ‘ईव्हीएम’चा डेटा आणि ‘व्हीव्हीपॅट’च्या स्लीप ४५ दिवस सुरक्षित ठेवल्या जातात. गरज पडल्यास हा तपशील न्यायालयामध्ये सादर करण्यात येतो.

‘व्हीव्हीपॅट’चे निर्माते
- इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.
- भारत इलेक्ट्रॉनिक्स लि.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com