नियम न पाळल्यास कोरोना मृत्यूची संख्या किती? ‘आयएचएमई’ केला भीतीदायक दावा

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 2 September 2020

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या मास्क लावणे, सुरक्षित अंतर आणि अन्य नियमांचे पालन भारतीय नागरिकांनी करणे आवश्‍यक आहे, असे अभ्यासात म्हटले आहे.

नवी दिल्ली- मास्क मोठ्या प्रमाणावर वापर आणि सुरक्षित अंतराच्या नियमाचे पालन अशा निर्बंधांमुळे भारतातील कोरोनाच्या मृतांची संख्या १ डिसेंबरपर्यंत दोन लाखापर्यंत मर्यादित राहील, असे मत एका पथदर्शी अभ्यासात व्यक्त केले आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युशन’ (आयएचएमई) या संस्थेने हा अभ्यास केला आहे. 

कोरोनामुळे भारतातील सार्वजनिक आरोग्याला मोठा धोका उद्भवू शकत असला तरी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या मर्यादित ठेवता येऊ शकेल. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या मास्क लावणे, सुरक्षित अंतर आणि अन्य नियमांचे पालन भारतीय नागरिकांनी करणे आवश्‍यक आहे, असेही अभ्यासात म्हटले आहे.

फक्त दहा रुपयात 'मोदी इडली'; अम्मा इडलीला देणार टक्कर

‘आयएचएमई’चे संचालक ख्रिस्तोफर मुरे म्हणाले म्हणाले की, भारतातील मोठ्या लोकसंख्येला अजूनही संसर्गाचा धोका असल्याने तेथे कोरोनाचे सावट लवकर हटण्याची शक्यता कमी आहे. उलट तेथे या साथीचा प्रादुर्भाव वाढण्याचे संकेत आमच्या अभ्यासातून मिळत आहेत. तेथील सरकारच्या उपाययोजना आणि नागरिकांकडून होणारे पालन यावर परिस्थिती अवलंबून आहे.

‘आयएचएमई’च्या संशोधकांची निरीक्षणे

- भारतात कोरोनाच्या मृतांची संख्या कमी.

- दिल्लीसारख्या शहरी भागात संपर्क शोध, मोठ्या प्रमाणावरील चाचण्या या व अशा उपायांमुळे संसर्ग प्रसार रोखण्यास मदत.

- भारतातील मृतांची संख्या ६० हजारवरून १ डिसेंबरपर्यंत दोन लाख ९१ हजार १४५ होण्याची शक्यता.

- लॉकडाउन शिथिल करीत गेल्यास आणि मास्कचा वापर न केल्यास कोरोनाच्या मृत्यूची संख्या चार लाख ९२ हजार ३८० पर्यंत वाढेल.

प्रश्नोत्तराचा तास रद्द करणे ही लोकशाहीची हत्या; विरोधकांची सरकारवर टीका

हरियानातील अशोका विद्यापीठाच्या भौतिक व जीवशास्त्र विभागाचे प्राध्यापक गौतम मेनन म्हणाले...

- कोरोनाला रोखण्यासाठी मास्क परिधान करणे व सुरक्षित अंतर ठेवणे आवश्‍यक.

-‘आयएचएमई’च्या निष्कर्षानुसार डिसेंबरच्या मध्यापर्यंत भारतात संसर्गाचा उच्चांक गाठणार.

- दररोज ६० लाख नवे रुग्ण आणि पाच लाख एकूण मृत्यू असे उच्चांकी स्वरूप असेल.

- मात्र यात बरे झालेल्या रुग्णसंख्‍येचाही समावेश हवा. ही संख्याही मोठी आहे.

- १ डिसेंबर पर्यंत १३ राज्यांमधील मृत्यूचा आकडा दहा हजारावर जाईल.

- आतापर्यंत केवळ महाराष्ट्रातच दहा हजारपेक्षा मृत्यू झाले आहेत.

- कोरोनावरील लस जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत भारतात कोरोनाचा धोका कायम.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What is the number of corona deaths if the rules are not followed IHME made a frightening claim