काय म्हणाले राजनाथसिंह काश्‍मीरबद्दल

पीटीआय
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

सद्यःस्थितीत जम्मू काश्‍मीरमध्ये दहशतवादी कारवाया असून नसल्यासारख्या असल्याचे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे खासदार के. सुरेश यांनी आज लोकसभेत शून्यप्रहरात जम्मू काश्‍मीरसंदर्भात प्रश्‍न विचारला होता. 

नवी दिल्ली - सद्यःस्थितीत जम्मू काश्‍मीरमध्ये दहशतवादी कारवाया असून नसल्यासारख्या असल्याचे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे खासदार के. सुरेश यांनी आज लोकसभेत शून्यप्रहरात जम्मू काश्‍मीरसंदर्भात प्रश्‍न विचारला होता.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

के. सुरेश यांनी सभागृहात जम्मू काश्‍मीरच्या स्थितीचा मुद्दा मांडला. ते म्हणाले की, जम्मू काश्‍मीरच्या अनेक भागांत दहशतवादी हल्ले झाले आणि त्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. आजघडीला जम्मू काश्‍मीरमधील स्थिती सामान्य दिसत नाही. काश्‍मीरच्या स्थितीबाबत सरकारकडून सभागृहाची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे याबाबत सरकारने निवेदन करावे, अशी मागणी त्यांनी केली. यावर संरक्षणमंत्री राजनाथसिंह म्हणाले की, गेल्या साडेपाच वर्षांत काश्‍मीर वगळता देशातील अन्य भागांत कोणताही मोठा घातपात झालेला नाही. जम्मू काश्‍मीरचा विचार केल्यास गेल्या ३० ते ३५ वर्षांत सातत्याने दहशतवादी हल्ले झाले आहेत. मात्र, कलम ३७० हटविल्यानंतर कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: what is talking rajnath singh about kashmir