
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताच्या जलद हल्ल्यांमुळे पाकिस्तानला ८६ तासांच्या आतच मागे टाकण्यात आले आहे. भारतासोबतच्या सीमेवरील लष्करी तणाव संपवण्यासाठी पाकिस्तानने युद्धबंदीची घोषणा केली आहे. भारताच्या हल्ल्यांमुळे घाबरलेल्या पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय समुदायालाही समेट घडवून आणण्याचे आवाहन केले होते. शनिवारी, १० मे रोजी पाकिस्तानच्या डीजीएमओने भारताच्या डीजीएमओंना फोन करून युद्धबंदीचे आवाहन केले. त्यानंतर भारतानेही ते मान्य केले.