मोदींवर आक्षेपार्ह पोस्ट; व्हॉटसऍप ग्रुप ऍडमिनला अटक

वृत्तसंस्था
बुधवार, 3 मे 2017

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मॉर्फिंग केलेले छायाचित्र व्हॉटसऍपवर पोस्ट केल्याने संबंधित व्हॉटसऍप ग्रुपच्या ऍडमिनला अटक करण्यात आले आहे.

भटकल (कर्नाटक) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मॉर्फिंग केलेले छायाचित्र व्हॉटसऍपवर पोस्ट केल्याने संबंधित व्हॉटसऍप ग्रुपच्या ऍडमिनला अटक करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांनी कर्नाटकमधील मुरुदेश्‍वर जिल्ह्यात कारवाई केली. "The Balse Boys' नावाच्या समूहावर नरेंद्र मोदी यांचे मॉर्फ केलेले आक्षेपार्ह छायाचित्र पोस्ट करण्यात आले होते आणि ते व्हॉटसऍप ग्रुपवर पाठविण्यात आले होते. या प्रकरणी मुरुदेश्‍वर पोलिस स्थानकात आनंद मंजुनाथ नाईक नावाच्या व्यक्तीने तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत, तातडीने कारवाई केली. या प्रकरणी संबंधित व्हॉटसऍप ग्रुपचा ग्रुप ऍडमिन कृष्णा सन्नाथम्मा नाईक (वय 30) याला अटक करण्यात आले आहे. तो व्यवसायाने रिक्षाचालक आहे. कृष्णाशिवाय गणेश नाईकला ताब्यात घेतले आहे. दरम्यान या प्रकरणातील अन्य एक आरोपी बाळकृष्ण नाईक पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. तर कृष्णाची जामीनावर सुटका झाली आहे.

मॉर्फिंग म्हणजे काय?
छायाचित्रांमध्ये बदल करण्याचे तंत्रज्ञान म्हणजे मॉर्फिंग. मूळ छायाचित्रात संगणकिय प्रणालीद्वारे (सॉफ्टवेअर) हवे ते बदल करण्याच्या प्रक्रियेला मॉर्फिंग म्हणतात. या प्रक्रियेत मूळ चित्राला किंवा छायाचित्राला दोन किंवा अधिक चित्रांसोबत एकत्र करून वेगळ्या स्वरुपात सादर केले जाते. हे काम एवढ्या सुक्ष्मपणे केले जाते की, मॉर्फिंग केलेले छायाचित्र पाहताना त्यातील बदल जाणवत नाही.

Web Title: WhatsApp group admin arrested over morphed photo of PM