WhatsAppवर ग्रुप न करता 256 जणांना पाठवा असा मेसेज

whatsapp
whatsapp

नवी दिल्ली: माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी लोकप्रिय असलेल्या WhatsApp वरून कोणताही ग्रुप न एकाच वेळी 256 मेसेज पाठवता येणार आहे.

सोशल नेटवर्किंगसाठी WhatsAppची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. WhatsApp नेटिझन्सची गरज ओळखून दिवसेंदिवस बदल करत आहे. मित्रमैत्रिणी, नातेवाईक, ऑफीस किंवा अन्य जणांशी एकत्रितपणे संवाद साधता यावा यासाठी WhatsApp वर अनेक ग्रुप तयार केले जातात. मात्र, प्रत्येकवेळी ग्रुपवरती चॅट करणे आणि सर्वांना पाठवणे शक्यत होत नाही. WhatsApp ग्रुपवरील अनेक मेसेज आपण न वाचताच डिलीट करतो. परंतु, यामध्ये महत्वाचा मेसेज आपल्याकडून वाचला न जाण्याची शक्यता असते. यामुळे व्हाट्सऍपच्या नवीन फिचर्सचा नेटिझन्सला मोठा फायदा होणार आहे

नवीन फिचर्समुळे WhatsApp वर आता ग्रुप तयार न करता एकाच वेळी तब्बल 256 जणांना मेसेज पाठवणे शक्य होणार आहे. यासाठी तुम्हाला ज्या व्यक्तींना मेसेज पाठवायचा आहे त्यांचा नंबर तुमच्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह असणे गरजेचे आहे. ग्रुप तयार न करता 256 जणांना ब्रॉडकास्ट लिस्टच्या मदतीने मेसेज पाठवू शकतो.

कसा पाठवाल मेसेज..
- WhatsApp ओपन करा.
- WhatsApp ओपन केल्यावर उजव्या बाजूला तीन डॉटवर क्लिक करा.
- क्लिक केल्यावर अनेक पर्याय दिसताल. त्यामध्ये New Broadcast या पर्याय निवडा.
- तुम्हाला ज्यांना मेसेज पाठवायचा आहे ते सर्व कॉन्टॅक्ट सिलेक्ट करा.
- जेव्हा तुमची लिस्ट पूर्ण होईल तेव्हा ग्रीन टीकवर क्लिक करा.
- व्हॉट्सऍपवर एक लिस्ट तयार झाल्यामुळे तुम्ही हा मेसेज पाठवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com