व्हाट्सअॅप स्टेटस व्हिडीओ करता येणार डाऊनलोड...

whattusup-image
whattusup-image

नवी दिल्ली : 2017 पासून सोशल नेटवर्कींग साईटनी स्टेटस स्टोरी ठेवण्यासाठी एक नवीन फीचर अॅड केले. त्यामध्ये व्हाट्सअॅपनेही हे नवीन फिचर चालू केले. सोशल नेटवर्कींग साईटमधील फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाट्सअॅपवर रोज लोक हजारो प्रकारच्या स्टोरीज शेअर करत असतात. या फीचरमध्ये आपण कुठलीही स्टोरी 24 तासासाठी ठेऊ शकतो. त्यामध्ये एखादा आपल्याला आवडलेला फोटो किंवा 30 सेकंदापर्यंतचा एखादा व्हिडीओ आपण स्टेटस स्टोरी म्हणून ठेऊ शकतो. 

व्हॉट्सअॅपवर हे फीचर चालू होऊन जवळपास एक वर्ष झाले परंतु, या फीचरची लोकांमध्ये क्रेज दिवसेंदिवस वाढतच आहे. अशावेळी कधी आपल्याला कोणाची स्टेटस स्टोरी आवडल्यास ती फोटोमध्ये असल्यास आपण स्क्रीनशॉट घेऊ शकतो. पण आपल्याला असा एखादा व्हिडीओ आवडल्यास तो आपल्याकडे घेता येत नाही. परंतु, आता हे सोपे झाले आहे. आता व्हाट्सअॅप स्टेटस स्टोरीचे व्हिडीओ डाऊनलोड करता येणार आहेत.

व्हाट्सअॅप स्टेटस स्टोरी डाऊनलोड करण्यासाठी आता वेगवेगळे अॅप आले आहेत. एखादे असे अॅप घेऊन आपण सहज कोणाच्याही व्हाट्सअॅप स्टोरीचा व्हिडीओ डाऊनलोड करु शकतो. सध्या 'Story Saver for Whatsapp' हे सर्वांना परिचीत असलेले अॅप आहे. याव्यतीरिक्त गुगल प्ले स्टोअरवर अशा स्वरुपातील अनेक अॅप उपलब्ध आहेत. हे अॅप वापरून तुम्ही सहज तुम्हाला आवडलेला व्हिडीओ डाऊनलोड करु शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com