
Cyclone Shakti Update
ESakal
गुजरात किनाऱ्यावर निर्माण झालेले तीव्र चक्रीवादळ शक्ती पश्चिमेकडे सरकत आहे. ते द्वारकेपासून सुमारे ५८० किमी पश्चिमेस, नालियापासून ५८० किमी पश्चिम-नैऋत्येस, कराची (पाकिस्तान) पासून ५१० किमी नैऋत्येस, रस अल हद (ओमान) पासून ३९० किमी पूर्वेस आणि मसिरा (ओमान) पासून ४९० किमी पूर्व-ईशान्येस केंद्रित होते. शक्ती चक्रीवादळ पश्चिम-नैऋत्येस सरकून ५ ऑक्टोबरपर्यंत वायव्य आणि लगतच्या पश्चिम-मध्य अरबी समुद्रात पोहोचण्याची अपेक्षा आहे.