एक कोटी रोजगाराचे आश्‍वासन कुठे दिले? तेजस्वी यादव यांचा भाजपवर निशाना

उज्‍ज्वल कुमार
Sunday, 25 October 2020

राष्‍ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते व मुख्यमंत्रिपदाचे दावेदार तेजस्वी यादव यांनी शनिवारी पक्षाचा जाहीरनामा घोषित केला. यात सत्तेवर आल्यानंतर दहा लाख नोकऱ्यांचे आश्‍वासन त्यांनी दिले. याबद्दल साशंकता व्यक्त केली असता ‘मी ५० लाख किंवा एक कोटी नोकऱ्या देण्याचे वचन देत नाही,असे सांगून हे भाजप व संयुक्त जनता दलावर (जेडीयू) निशाणा साधला. दहा लाख नोकऱ्यांचे आश्‍वासन कसे पूर्ण करणार याचा खुलासाही तेजस्वी यांनी केला.

पाटणा - राष्‍ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते व मुख्यमंत्रिपदाचे दावेदार तेजस्वी यादव यांनी शनिवारी पक्षाचा जाहीरनामा घोषित केला. यात सत्तेवर आल्यानंतर दहा लाख नोकऱ्यांचे आश्‍वासन त्यांनी दिले. याबद्दल साशंकता व्यक्त केली असता ‘मी ५० लाख किंवा एक कोटी नोकऱ्या देण्याचे वचन देत नाही,असे सांगून हे भाजप व संयुक्त जनता दलावर (जेडीयू) निशाणा साधला. दहा लाख नोकऱ्यांचे आश्‍वासन कसे पूर्ण करणार याचा खुलासाही तेजस्वी यांनी केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भाजपने जाहीरनाम्यात लस मोफत देणार असल्याचे आश्‍वासन दिल्यानंतर तेजस्वी यादव यांनी ‘आरजेडी’चा जाहीरनामा आज प्रकाशित केला. युवकांना दहा लाख नोकऱ्यांसह शेतकऱ्यांना किमान हमीभाव, राज्यात आरोग्य केंद्रात उत्तम सुविधा आणि ‘स्मार्ट गावे’ विकसित करण्याची संकल्पना यावर या जाहीरनाम्यात भर दिला आहे. ते म्हणाले की, हा जाहीरनामा नाही तर संकल्प आहे आणि तो वास्तवात उतरले.  मंत्रिमंडळ बैठकीच्या पहिल्या दिवशीच दहा लाख नोकऱ्यांसंबंधीच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करीन, अशी ग्वाही मी तुम्हाला देतो. आम्ही रोजगार निर्मिती कोठे करणार, अशी थट्टा होत आहे. पण तुम्ही एक लक्षात घ्यायला हवे की रोजगार आणि नोकरी यात फरक आहे. येथे आम्ही सरकारी नोकऱ्यांविषयी बोलत आहोत, असा खुलासा त्यांनी केला.

भाजपने दोन विद्यमान आमदारांसह 7 जणांची केली हकालपट्टी

भाजप नोकऱ्यांचे आश्‍वासन देत आहे, पण नितीश कुमार म्हणतात पैसा उपलब्ध नाही. ते कोणाला मूर्ख बनवत आहेत.
- तेजस्वी यादव, ‘आरजेडी’चे नेते

‘आरजेडी’च्या जाहीरनाम्यात...

 • युवकांसाठी दहा लाख नोकऱ्या
 • समान काम, समान वेतन
 • ३५ वर्षांपर्यंतच्या युवकांना १५०० रुपये बेरोजगार भत्ता
 • शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणार
 • पीककर्ज माफ करणार
 • किमान हमी भावाने पीक खरेदी
 • ‘स्मार्ट गाव’ योजनेअंतर्गत प्रत्येक पंचायतीत सिमेंटचे रस्ते तयार करणार
 • स्थानिकांसाठी प्रत्येक गावात मोफत संगणक प्रशिक्षण केंद्र
 • प्रत्येक जिल्ह्यात डायलिसिस केंद्र. गरिबांना मोफत सुविधा
 • प्राथमिक आरोग्य केंद्रात निदान कक्ष उभारणार
 • राज्याच्या एकूण अर्थसंकल्पातील २२ टक्के निधी शिक्षणासाठी राखीव

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Where he promised one crore jobs tejashwi yadav comment on bjp