Mukhtar Ansari : डझनभर खटले, ७५ हजारांचं बक्षीस, अनेक वर्षांपासून फरार; कुठे आहे मुख्तार अन्सारीची पत्नी अफशा?

Mukhtar Ansari Crime News: अफशा अन्सारीवर शोध सुरू; गँगस्टरच्या पत्नीवर गुन्हे आणि बक्षीसाची घोषणा
Mukhtar Ansari News
Mukhtar Ansari News esakal

Mukhtar Ansari News : गँगस्टर मुख्तार अन्सारीच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मागच्या अनेक वर्षांपासून फरार असलेली त्याची पत्नी अफशा अन्सारी आतातरी समोर येईल की नाही? अफशावर पोलिसांनी बक्षीस घोषित केलेलं आहे. मागच्या अनेक दिवसांपासून पोलिस अफशाच्या मागावर आहेत. तिच्यावर डझनभर खटले दाखल असून गँगस्टर अॅक्टनुसार तिच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे.

तिच्यावर अनेक फसवणुकीचे गुन्हे, जमीन बळकावल्याची प्रकरणं, सरकारी जमिनी हडप करणे अशी प्रकरणं दाखल आहेत. शिवाय बळजबरीने रजिस्ट्री केल्याची केस तिच्यावर दाखल आहे.

सांगितलं जातंय की, मुख्तार अन्सारी जेव्हा २००५ मध्ये जेलमध्ये गेला तेव्हा अफशाने गँगची सूत्र हाती घेतली होती. लग्नापूर्वी अफशावर कोणतीही केस दाखल नव्हती. परंतु आता गँगस्टर अॅक्टनुसार वेगवेगळे गुन्हे तिच्यावर दाखल आहेत.

Mukhtar Ansari News
Jammu Kashmir Accident News : जम्मू-काश्मीरमध्ये भीषण अपघात; टॅक्सी दरीत कोसळल्याने 10 जणांचा मृत्यू

अफशा ही गाझीपूर जिल्ह्यातील युसूफपूर मोहम्मदाबात येथील दर्जी मोहल्ला येथील राहणारी आहे. काही वर्षांपूर्वी मऊ येथील रेली गावाजवळ तिने विकास कन्स्ट्रक्शन नावाने फर्म बनवून जमीन घेतली. त्यावर तिने एक गोदाम उभं केलं. त्या गोदामाला भाड्याने एफसीआयला दिलं होतं. ही फर्म पाच लोकांच्या नावावर रजिस्टर्ड होती. ज्यात मुख्तार अन्सारीची पत्नी अफशा, त्याचे दोन्ही मेव्हणे अनवर सहजाद आणि आतिफ रजा तसेच रविंद्र नारायण सिंह, जाकिर हुसैन उर्फ विक्की यांचा सहभाग होता.

महसूल विभागाच्या तपासणीमध्ये आढळून आलं की, विकास कन्स्ट्रक्शन फर्मने अनुसूचित जातीसाठी दिलेली जमीन चुकीच्या पद्धतीने आपल्या नावावर केली. त्याशिवाय काही इतर लोकांची जमिनी चुकीच्या पद्धतीने लाटल्या. या प्रकरणाची तत्कालीन तहसीलदार पीसी श्रीवास्तव यांनी चौकशी केली. याच प्रकरणात अफशावर कारवाई झाली आणि तिच्यावर बक्षिसाची रक्कम घोषित करण्यात आली.

Mukhtar Ansari News
Crime News: संभाजीनगर हादरलं! बहिणीच्या 'लव्ह मॅरेज'ला मदत केल्याची भयानक शिक्षा, डोक्यावर चार वेळा बोलेरो घालून केली हत्या

मुख्तार अन्सारीचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टर आणि राजकीय नेता मुख्तार अन्सारी याचा तुरुंगातच तीव्र हृदविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. छातीत अत्यंत वेदना होऊ लागल्यानं तातडीनं त्याला बांदा इथल्या सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. पण रुग्णालयात दाखल केल्यानंतर लगेचच त्याची प्राणज्योत मालवली.

कोण हाता मुख्तार अन्सारी?

  • मुख्तार अन्सारी हा समाजवादी पार्टीकडून पाच वेळा आमदार राहिला होता.

  • त्याच्यावर ६१ हत्येचे, खंडणीचे आणि जमीन बळकावण्याचे गुन्हे दाखल होते.

  • कॉन्ट्रॅक्टर सच्चिदानंद राय यांच्या हत्येचा गुन्हा अन्सारीवर होता.

  • त्याचबरोबर काँग्रेस नेते अवधेश राय यांची त्यानं काशी इथं हत्या केली होती.

  • भाजपचा आमदार कृष्णानंद राय यांच्यावर अन्सारी यानं २१ गोळ्या झाडल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com