#MeToo दहा वर्षांपूर्वी कोठे होते : बप्पी लाहिरी

पीटीआय
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

मुंबई : मी-टू प्रकरणावरून अनेक सेलिब्रिटी मत मांडत असताना आज बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार आणि गायक बप्पी लहिरी यांनीही या वादात उडी घेतली आहे. आरोप करणारे लोक दहा वर्षांपूर्वी कोठे होते, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे. 

बप्पी लहिरी म्हणाले, की जुन्या प्रकरणांवरून सध्या जे काही घडत आहे, ते पाहता मला असे विचारायचे, की त्या वेळी हा मुद्दा का मांडला गेला नाही. घटना घडली तेव्हा तक्रार का नोंदवली नाही, एफआयआर का लिहिला नाही. एकानंतर एक येणाऱ्या बातम्या पाहता या गोष्टी अगोदरच येणे अपेक्षित होते. आज आम्ही एका चित्रपटाचे संगीत लॉंच करत आहोत. दहा वर्षांनंतर या चित्रपटाच्या संगीबाबत बोलून काय फायदा? 

आपल्या देशात महिलांना सर्वाधिक मान दिला जातो. आई, बहीण, मुलगी अशा रूपातून आपण पाहतो. आपल्याला महिलांचा मान ठेवायलाच हवा. आपल्यासारखी संस्कृती अन्य कोणत्याच देशात नाही. मात्र, कोणतेही पुरावे नसताना आरोप लावणे चुकीचे आहे. अचानक काही वर्षांनंतर चित्रपट उद्योगातील दिग्गज मंडळींवर होत असलेले आरोप आपल्या आकलनापलीकडचे आहेत, असे ते म्हणाले. 
 
Web Title: Where was ten years ago says Bappi Lahiri on MeToo