esakal | भारतात कोरोनाला रोखण्यासाठी उपाय योजनांवर WHO चे धक्कादायक विधान 
sakal

बोलून बातमी शोधा

World health orgnization

भारतात कोरोना रुग्णांची संख्या सहा लाखांच्या वर पोहोचली असतानाही जागतिक आरोग्य संघटनेनं कौतुक केलं आहे.

भारतात कोरोनाला रोखण्यासाठी उपाय योजनांवर WHO चे धक्कादायक विधान 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - भारतात कोरोना रुग्णांची संख्या सहा लाखांच्या वर पोहोचली असतानाही जागतिक आरोग्य संघटनेनं कौतुक केलं आहे. कोरोनाच्या लढ्यात भारताने चांगली कामगिरी केली आहे. मात्र भारताला आकडेवारीवर लक्ष द्यायला हवं असं सांगत इशाराही दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, भारतासमोर लोकसंख्या, भौगोलिक परिस्थिती आणि इथल्या विविधतेचं आहे. भारतात प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या साथीच्या आजारांचाही प्रादुर्भाव यांचं मोठं आव्हान आहे.

दरम्यान, भारतात जानेवारीपासूनच कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना कऱण्यात येत होत्या असंही धक्कादायक विधान WHO च्या मुख्य वैज्ञानिक डॉक्टर स्वामीनाथन यांच्याकडून करण्यात आलं आहे. भारतात प्रत्यक्षात 26 मार्चला लॉकडाऊन करण्यात आले. त्याआधी महिनाभर देशात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची रॅली, मध्य प्रदेशातील राजकीय घडामोडी यामुळे सरकारने कोरोनाकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप विरोधकांनी केले होते. 

हे वाचा - मोदीजी, फोटो खोटं बोलत नाहीत; चिनी घुसखोरीवरुन काँग्रेसचा पुन्हा हल्लाबोल

WHO ने भारत सरकारच्या राजकीय नेतृत्वाचे कौतुक केलं. यात तपासणीची प्रक्रिया उभारणे आणि मोठ्या प्रमाणावर त्याच्या नियोजनाबद्दल मत व्यक्त केलं. लॉक़डॉऊनचे नियम आणि पुन्हा अनलॉक करताना नियोजनबद्ध पद्धतीने सर्व बाबी लक्षात घेण्यात आल्या. आता पुढच्या टप्प्याचा भारतासह अनेक देश सामना करत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं की आता दीर्घकालीन नियोजनाबाबत विचार करायला हवा. 

जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य वैज्ञानिक डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, भारताने सुरुवातीपासूनच याबाबत गांभीर्याने पावले उचलली आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसीनंतर जानेवारीतच काही उपाय करण्यात आल्याचंही विधान त्यांनी केलं. भारतात टेस्टिंग किट विकसित केले जात आहेत. भारतासाठी हे एक मोठं यश आहे की गेल्या काही महिन्यांपासून टेस्टिंग किटच्या बाबतीत आत्मनिर्भर बनला आहे. देशात मोठ्या प्रमाणावर याची निर्मिती होत आहे. 

हे वाचा - भारत विरुद्ध चीन: कागदावर ड्रॅगनची शक्ती मोठी, पण...

डॉक्टर स्वामीनाथन यांनी म्हटलं की, देशातील आकडेवारीवर फोकस असायला हवा. आपल्याकडे असलेल्या आकडेवारीकडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे. फक्त एकूण कोरोना बाधित आणि एकूण मृत्यू यांच्या संख्येवर लक्ष देत आहे. मात्र हा तर फक्त एक भाग आहे. एक उदाहरण देताना त्यांनी सांगितलं की, WHO ने काही मापदंडांची शिफारस केली आहे.

सरकार त्याचा साथीच्या रोगांचा आढावा घेण्यासाठी उपयोग करू शकते. साथ कुठपर्यंत पोहोचली आहे. तुम्ही डेटा रिपोर्ट कसा करता? याशिवाय अनेक प्रकारच्या राष्ट्रीय नियमांची आवश्यकता आहे. याशिवाय तुम्ही तुलना करू शकत नाही. प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे रिपोर्ट करत आहे. महत्वाची गोष्ट सर्वांनी समजून घेतली पाहिजे ती म्हणजे रोगाचे विज्ञान. लोकसंख्येच्या तुलनेत बाधित रुग्णांची संख्या कुठं आणि किती आहे या सर्व परीक्षणावर सगळं अवलंबून आहे असं ते म्हणाले.

loading image