कोण होते भैय्यूजी महाराज ?

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 जून 2018

भैय्यूजी महाराज यांचे खरे नाव उदयसिंह देशमुख. त्यांचा जन्म मध्यप्रदेशातील शुजालपुर येथे झाला होता. अध्यात्माची लहानपणापासूनच त्यांना आवड होती. घोडस्वारी आणि तलवारबाजीतही ते पारंगत होते. सुरवातीच्या काळात मुंबईत एका खाजगी कंपनीत काम केल्यानंतर त्यांनी काही दिवस मॉडेलिंगचे काम केले. सियाराम कंपनीमध्ये त्यांनी काही दिेवस काम केले होते. 

इंदोर - भैय्यूजी महाराज यांचे खरे नाव उदयसिंह देशमुख. त्यांचा जन्म मध्यप्रदेशातील शुजालपुर येथे झाला होता. अध्यात्माची लहानपणापासूनच त्यांना आवड होती. घोडस्वारी आणि तलवारबाजीतही ते पारंगत होते. सुरवातीच्या काळात मुंबईत एका खाजगी कंपनीत काम केल्यानंतर त्यांनी काही दिवस मॉडेलिंगचे काम केले. सियाराम कंपनीमध्ये त्यांनी काही दिेवस काम केले होते. 

परंतु, अध्यात्माची ओढ असल्याने त्यांचे मन दुसऱ्या क्षेत्रात रमत नव्हते. पुढे त्यांनी धार्मिक ट्रस्ट चालवण्याचा निर्णय घेतला. इंदोरबरोबरच महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात त्यांचा एक आश्रम आहे. त्यांच्या संस्था महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या राज्यात धार्मिक क्षेत्रात काम करत आहेत. मध्यप्रदेश सरकारने दिलेला राज्यमंत्र्याचा दर्जाही त्यांनी नाकारला होता. पहिल्या पत्नीच्या मृ्त्यूनंतर त्यांनी दुसरा विवाह केला. मोठमोठ्या राजकीय नेत्यांसोबत त्यांचे सलोख्याचे संबध होते. अण्णा हजारेंच्या आंदोलनानंतर ते प्रकाशझोतात आले. 

दरम्यान, राष्ट्रसंताचा दर्जा प्राप्त झालेले आधात्मिक गुरु भैय्यूजी महाराजांनी स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. मध्यप्रदेशातील इंदूर येथील त्यांनी त्यांच्या राहत्या घरी स्वत:वर गोळी झाडली. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. भैय्यूजी महाराजांनी स्वत:वर का गोळी मारली याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली. 

Web Title: who is bhayyyuji maharaj ?