Lok Sabha elections 2024: ओवैसींचा पराभव करणार भाजपची महिला उमेदवार? कोण आहेत माधवी लता?

BJP Hyderabad MP Candidate Madhavi Latha: भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात १९५ उमेदवारांची नावे आहेत.
 Madhavi Latha and Owaisi
Madhavi Latha and Owaisiesakal

Madhavi Latha : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात १९५ उमेदवारांची नावे आहेत. तेलंगणातील हैद्राबादमधील जागेसाठी भाजपने माधवी लता यांना तिकीट दिले आहे. हैद्राबाद हा चर्चेतला मतदारसंघ आहे. कारण, एमआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांचा हा बालेकिल्ला मानला जातो. २००४ पासून ते या मतदारसंघातून सलग खासदार आहेत.

हैद्राबादच्या जागेवर १९८४ पासून ओवैसी कुटुंबियांचा ताबा आहे. असदुद्दीन ओवैसी यांचे वडील सुल्तान सलाउद्दीन ओवैसी यांनी १९८४ मध्ये पहिल्यांदा या जागेवरुन निवडणूक लढवली होत. तेव्हा पासून हा मदरादसंघ ओवैसी कुटुंबाकडे आहे. २००४ मध्ये या जागेवरुन असदुद्दीन ओवैसी यांनी लढण्यास सुरुवात केली. तेव्हापासून ते खासदार आहेत.Who Is BJP Hyderabad MP Candidate Madhavi Latha Lok Sabha constituency Asaduddin Owaisi 2024

 Madhavi Latha and Owaisi
BJP first list: मुलाने शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप, त्यांना पुन्हा उमेदवारी; भाजपच्या पहिल्या यादीतील १० महत्त्वाचे मुद्दे

कोण आहेत डॉ. माधवी लता? (Who Is BJP Hyderabad MP Candidate Madhavi Latha)

भाजपने उमेदवारी दिलेल्या डॉ. माधवी लता कोण आहेत हे आपण जाणून घेऊया. त्या विरिंजी हॉस्पिटलच्या अध्यक्षा आहेत. त्या सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असतात. हिंदूत्वाच्या मुद्द्यावरुन त्या भाष्य करत असतात. माधवी या भरतनाट्यम डान्सर देखील आहेत.

हैद्राबादमध्ये त्यांचा सामाजिक कार्यात देखील सहभाग असतो. त्या आरोग्य, शिक्षा या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने काम करत असतात. त्या लोपामुद्दा चॅरिट्रेबल ट्रस्ट आणि लतामा फाऊंडेशनच्या प्रमुख आहेत. त्यांनी कोटा महिला कॉलेजमधून राजनीती शास्त्रात एमए केले आहे. ओवैसींना टक्कर देण्यासाठी भाजपने पहिल्यांदा महिला उमेदवाराला संधी दिली आहे. माधवी या हिंदूत्वाच्या मुद्द्यावर आग्रही असतात.

 Madhavi Latha and Owaisi
BJP First List Lok Sabha: प्रज्ञा ठाकूर...हर्ष वर्धन; भाजपने कोणत्या दिग्गजांचं कापलं तिकीट? जाणून घ्या

मागील वेळेस भाजपने भगवत राम यांना उमेदवारी दिली होती. पण, त्यांना जवळपास तीन लाख मतांनी पराभव स्विकारावा लागला होता. त्यामुळे आता महिला उमेदवार उभे करुन भाजपने नवा डाव खेळला आहे. असे असले तरी ओवैसी यांना हरवणं सोपं नाही. हैद्राबादमध्ये ओवैसींचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे निवडणुकीत भाजपची रणनीती यशस्वी होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com