

Ajay Murdia And Vikram Bhatt
ESakal
बॉलिवूड चित्रपट निर्माते विक्रम भट्ट आणि त्यांची पत्नी श्वेतांबरी भट्ट यांना रविवारी मुंबई आणि राजस्थान पोलिसांच्या संयुक्त पथकाने अटक केली. त्यांना मुंबईतील यारी रोडवरील गंगा भवन अपार्टमेंटमधून अटक करण्यात आली. जे त्यांच्या मेहुणीचे घर असल्याचे सांगितले जाते. उदयपूर पोलिस आता त्यांना ट्रान्झिट रिमांडसाठी वांद्रे न्यायालयात हजर करणार आहेत. हा खटला उदयपूरमधील एक प्रसिद्ध उद्योगपती डॉ. अजय मुरडिया यांच्याशी जोडला गेला आहे.