Who is Firoz Merchant : अडीच कोटींच्या बदल्यात 900 जणांची UAE तुरुंगातून सुटका; कोण आहेत भारतीय उद्योगपती फिरोज मर्चंट?

Who is Firoz Merchant : पुढच्या महिन्यात १० मार्चपासून रमजान महिना सुरू होतोय. यापूर्वी भारतीय उद्योगपती फिरोज मर्चंट यांनी यूएईच्या जेलमधून ९०० भारतीय कैद्यांना सोडवण्याचा निर्णय घेतला आहे.
Who is Firoz Merchant : अडीच कोटींच्या बदल्यात 900 जणांची UAE तुरुंगातून सुटका; कोण आहेत भारतीय उद्योगपती फिरोज मर्चंट?

Who is Firoz Merchant Latest News : पुढच्या महिन्यात १० मार्चपासून रमजान महिना सुरू होतोय. यापूर्वी भारतीय उद्योगपती फिरोज मर्चंट यांनी यूएईच्या जेलमधून ९०० भारतीय कैद्यांना सोडवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी तब्बल २.५ कोटी रुपये दान केले आहेत. इस्लाममधील पवित्र महिना रमजान नम्रता, मानवता, क्षमा आणि दयाळूपणाचा महिना म्हणून ओळखला जातो.

विशेष म्हणजे कैद्यांच्या सुटकेसाठी इतकी मोठी रक्कम दिली जाण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. मागील काही वर्षात फिरोज यांनी तब्बल २० हजारहून अधिक कैद्यांची सुटका केली आहे. कैद्यांना मुक्त करणारे फिरोज मर्चंट कोण आहेत हे आपण जाणून घेऊयात.

कोण आहेत फिरोज मर्चंट?

दुबई येथील ६६ वर्षीय फिरोज मर्चंट हे भारती व्यावसायीक आहेत जे प्युअर गोल्ड ज्वेलर्सचे मालक आहेत. फिरोज हे आपल्या परोपकारी कामासाठी खासकरून जेलमधून कैद्यांना सोडवण्यासाठी ओळखले जातात. फिरोज जेलमध्ये बंद कैद्यांचे कर्ज फेडतात आणि त्यांना स्वदेशात परत जाण्यासाठी त्यांच्या विमानांच्या तिकीटांची देखील व्यवस्था करतात.

यूएईच्या जेलमधून ९०० भारतीयांची सुटका करण्याबाबत फिरोज मर्चंट यांच्या कार्यालयाने निवेदन जारी केलं आहे. यामध्ये दुबई बेस्ड भारतीय उद्योगपती फिरोज मर्चंट यांनी अरब देशांच्या कारागृहातील ९०० कैद्यांची सुटकेसाठी तब्बल २.२५ कोटी दान केल्याचे सांगण्यात आले आहे.

Who is Firoz Merchant : अडीच कोटींच्या बदल्यात 900 जणांची UAE तुरुंगातून सुटका; कोण आहेत भारतीय उद्योगपती फिरोज मर्चंट?
Anant Ambani: 'अंबानी कुटुंबाचा सनातन धर्मावर विश्वास', राजकारणात येणार? अनंत अंबानी म्हणाले...

२००८ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या फॉरगॉटन सोसाइटी अंतर्गत फिरोज मर्चंट यांनी संयुक्त अरब अमीरातच्या जेलमधील ९०० कैद्यांना बाहेर काढण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे. यामध्ये अजमानचे ४९५ कैदी, फुरैराहचे १७० कैदी, दुबईचे १२१ कैदी आणि इतर ६९ कैद्यांच्या सुटकेचा समावेश आहे. उम्म क्वैनचे आणि रास अल खैमा येथील २८ कैद्यांना देखील कारागृहाबाहेर काढण्यात आलं आहे.

झोपडपट्टीतून कोट्यधीश बनण्याचा फिरोज मर्चंट यांचा प्रवास खास आहे. त्यांचे वडिल गुलाम हुसैन एक रियल इस्टेट ब्रोकर होते. तर त्यांच्या आही मालेकाबाई एक गृहिणी होत्या. ११ सदस्य असलेल्या कुटुंबात हुसैन हे एकमात्र कमवते होते. गुलाम हुसैन यांचं संपूर्ण कुटूंब मुंबईतील भिंडी बाजार येथील इमामवाडा वस्तीत राहत असे.

Who is Firoz Merchant : अडीच कोटींच्या बदल्यात 900 जणांची UAE तुरुंगातून सुटका; कोण आहेत भारतीय उद्योगपती फिरोज मर्चंट?
Tigmanshu Dhulia 'काश्मिर फाईल्स अतिशय बेकार चित्रपट, अशा चित्रपटांमुळे...' पान सिंग तोमरच्या तिग्मांशू धुलियानं केली आगपाखड

१९८० मध्ये फिरोज मर्चंट यांचं लग्न मुंबईच्याच रोजिना यांच्याशी झालं. फिरोज हा त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट असल्याचे सांगतात. त्यांना सांगितलं की मी हनीमूनसाठी दुबईत आलो होतो. याच काळात दुबईतील गोल्ड मार्केट सूक येथे देखील गेलो होतो. मी या जागेच्या प्रेमातच पडलो. जसे मी गोल्ड सूकमध्ये प्रवेश केला, चमकदार पीवळ्या रंगांच्या धातूंनी सजलेली दुकाने आणि दागिन्यांनी सजलेली दुकाने पाहण्यात दंग होऊन गेलो. मी देखील दागिन्यांच्या व्यावसायाला सुरूवात करून दुबईत राहू इच्छित होतो.

मी माझ्या हनिमूनचा जास्तीत जास्त काळ गोल्ड सूकमध्ये घालवला, जेणेकरून मी हा व्यवसाय कसा चालतो हे समजून घेऊ शकेल. गोल्ड सूक पाहूण मी मंत्रमूग्ध झालो होतो. मी लगेच एका दागिने व्यावसायिक बनू इच्छित होतो. त्याच् उत्साहात मी घरी आलो. पण पण माझं स्पप्न धरी जाताचं भंग झालं. जेव्हा मी माझ्या वडिलांना दुबईमध्ये जाऊन दागिन्यांचा व्यापार करण्याबद्दल सांगितलं. तेव्हा त्यांनी माझी कल्पना पूर्णपणे नाकारली. अनेक वर्ष समजावून सांगितल्यानंतर फिरोज मर्चंट यांच्या वडिल १९८९ मध्ये हा विचार मान्य केला आणि त्यांना दुबईला जाण्याची परवानगी दिली.

फिरोज मर्चंट यांनी म्हणणं आहे की, या मिशन संयुक्त अरब अमीरात त्यांना परिवारांशी पुन्हा भेटण्याची संधी देतं ही गोष्ट लक्षात ठेवून सुरू करण्यात आलं आहे. त्यांच्या प्रयत्नामधून २०२४ मध्ये ३००० हून अधिक कैद्यांची सुटका करणअयात येईल आणि त्यांना आपल्या कुटुंबियांकडे पाठवण्यात येईल, फिरोज मर्चंट यांच्या या प्रयत्नांना दुबई येथील प्रशासनाने मंजूरी दिली आहे.

मर्चंट यांनी त्यांच्या निवेदनात सांगितलं की मी सरकारी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आल्याबद्दल भाग्यशाली ठरलो, फॉरगॉटन सोसायटी उपक्रम मानवतेचा विस्तार करतो. आम्ही त्यांना त्यांच्या देशात आणि समाजात त्यांच्या कुटुंबांसोबत जोडण्यासाठी एकत्र काम करतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com