IAS पद्मा जयस्वाल कोण? २३ वर्षे सेवेनंतर बडतर्फ, राष्ट्रपतींनी कारवाईला दिली मंजुरी

IAS Padma Jaiswal आयएएस अधिकारी असलेल्या पद्मा जयस्वाल यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलंय. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या शिफारसीनंतर भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आलीय.
Padma Jaiswal dismissal after two decades in service sparks discussion

Padma Jaiswal dismissal after two decades in service sparks discussion

Esakal

Updated on

केंद्र सरकारने भ्रष्टाचाराच्या आरोप प्रकरणी आयएएस अधिकारी पद्मा जयस्वाल यांच्यावर कठोर कारवाई केलीय. ही कारवाई दुर्मिळ मानली जात आहे. २००३ च्या बॅचच्या एजीएमयूटी कॅडरच्या वरिष्ठ आयएएस अधिकारी असलेल्या पद्मा जयस्वाल यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलंय. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या शिफारसीनंतर भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग हा थेट पंतप्रधानांच्या अखत्यारित काम करतो. एजीएमयुटी कॅडरच्या अधिकाऱ्यांच्या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसींच्या आधारे निर्णय घेतला जातो. Padma Jaiswal dismissal after two decades in service sparks discussion

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com