
Tahawwur Rana Case: मुंबईवरील २६\११ दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याला गुरुवारी भारतात आणलं जाणार आहे. अमेरिकन सुप्रीम कोर्टाने राणाची याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे एक विशेष पथक त्याला भारतात घेऊन येत आहे. या मोहिमेची जबाबदारी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांच्याकडे आहे. योगायोग असा की, दाते यांनी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलेलं होतं. २००८ मधील त्या हल्ल्यामध्ये १६६ नागरिकांचा मृत्यू झाला होता.