
प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेमध्ये झालेल्या गोळीबारासाठी हरजीत सिंग लड्डी जबाबदार आहे. तो एक खलिस्तानी दहशतवादी आहे. ज्याने कॅनडातील ब्रिटिश कोलंबियामधील सरे येथील कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेमध्ये अंदाधुंद गोळीबार केला होता. गोळीबाराची जबाबदारी स्वीकारणारा हरजीत सिंग लड्डी हा भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे. ज्याच्यावर देशाच्या सुरक्षा एजन्सीने १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.