बिहार रेल्वे आंदोलन : विद्यार्थ्यांना भडकावण्याचा आरोप असलेले खान सर कोण?

RRB NTPC Protest : आंलनातील विद्यार्थ्यांना भडकावल्याचा आरोप खान सरांवर करण्यात आला आहे.
Khan SIr
Khan SIr Team eSakal

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि बिहारच्या (Bihar) अनेक जिल्ह्यांत सध्या रेल्वे भरती बोर्डाच्या RRB-NTPC या गैर-तांत्रिक श्रेणीच्या परीक्षांमधील घोटाळ्यांच्या विरोधात निदर्शनं (RRB NTPC Protest) सुरू आहेत. या आंदोलनानं आता हिंसक वळण घेतलं असून, गया जिल्ह्यात रेल्वे पेटवण्यात आल्याची (Train Vandalize in Gaya) घटना समोर आली आहे. तर इतर काही स्थानकांवरही निदर्शनं करण्यात आली आहे. आंदोलक जमावाने गया जंक्शनवर आक्रमक भुमिका घेत, घोषणाबाजी केली आणि भाबुआ-पाटणा इंटर सिटी एक्स्प्रेस पेटवून दिली. चौथ्या दिवशी निदर्शनाला हिंसक वळण लागू नये यासाठी चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. याप्रकरणी कोचिंग क्लासचे संचालक आणि यूट्यूबर फैजल खान उर्फ 'खान सर' यांच्यासह काही कोचिंग क्लासच्या संलालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे खान सर हे नाव पुन्हा चर्चेत आलं आहे.

Khan SIr
"विद्यार्थ्यांनी कायदा हातात घेऊ नये",रेल्वेमंत्र्यांचं आव्हान; पाहा व्हिडिओ

बुधवारी सायंकाळी उशिरा पाटणा येथील पत्रकार नगर पोलीस ठाण्यात कोचिंग क्लासचे संचालक आणि प्रसिद्ध युट्यूबर खान सर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलनातील विद्यार्थ्यांना भडकावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यांच्यावर एफआयआर नोंदवल्यानंतर सोशल मीडियापासून गुगल सर्च इंजिनपर्यंत खान सरांचंच नाव ट्रेंड होतंय. खान सर नेमके आहेत तरी कोण हे जाणून घेण्याचा प्रयत्न लोक करत आहेत.

Khan SIr
देशभक्तीची भावना जागृतीसाठी केजरीवालांनी दिल्लीत 75 ठिकाणी फडकवला तिरंगा

फैजल खान अर्थात खान सर हे मूळ देवरिया, उत्तर प्रदेशचे असून, ते पाटना येथे जीएस कोचिंग सेंटर चालवतात. मात्र, यूट्यूबवर क्लासेस सुरू केल्यानं ते जोरदार चर्चेत असतात. ग्रामीण लहेजा असणाऱ्या भाषेत अत्यंत मनोरंजक पद्धतीनं ते शिकवत असल्यानं खान सरांचे सोशल मीडियावर भरपूर चाहते आहेत.

शिकवण्याच्या त्यांच्या खास शैलीमुळे फार कमी काळात ते प्रसिद्ध झाले. यूट्यूबवर क्लास घेण्यासोबतच खान सर खान जीएस रिसर्च सेंटरही नावाचं कोचिंग सेंटर सुरू केलं. याशिवाय खान सरांनी सामान्य ज्ञान आणि विज्ञान इत्यादींवर काही पुस्तकंही लिहिली आहेत. त्यांनी उर्दू भाषेतही एक पुस्तकही लिहिलंय.

वडील सैन्यात अधिकारी तर भाऊ कमांडो...

खान सरांचे वडील भारतीय सैन्यात अधिकारी आहेत. एका व्हिडिओमध्ये त्यांनी हे सांगितलं होतं. खान सरांची आई गृहिणी असून, खान सरांचा मोठा भाऊ सुद्धा लष्करात कमांडो म्हणून तैनात आहे. कुटुंबातील लष्कराच्या वातावरणामुळे खान सरांनी बारावीचं शिक्षण पूर्ण करून लष्करात भरती होण्यासाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रवेश घेण्याची तयारीही केली होती, लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखतीदरम्यान त्यांची निवड झाली नव्हती.

Khan SIr
Video: नक्षलवाद्यांकडून रेल्वे लाईनवर बाॅम्बस्फोट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com