IPS Mohibullah Ansari : कोण आहेत मोहिबुल्लाह अंसारी? अमेरिकेत मिळणार ‘एशियन हिरो अवॉर्ड’; जाणून घ्या IPS अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास

Mohibullah Ansari biography : मोहिबुल्लाह अंसारी कोण आहेत? प्री-बोर्ड परीक्षेत अपयश ते IIT दिल्ली आणि UPSC यश असा प्रवास करत ते IPS अधिकारी झाले. आता अमेरिकेत ‘एशियन हिरो अवॉर्ड 2026’ने सन्मान होणार आहे.
IPS Mohibullah Ansari bihar

IPS Mohibullah Ansari bihar

esakal

Updated on: 

Bihar IPS officer Mohibullah Ansari : शालेय जीवनात अभ्यासात मागे राहिल्यानंतर दहावी-बारावीच्या सराव परीक्षांमध्ये नापास झालेल्या मोहिबुल्लाह अंसारी यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) दिल्ली गाठली. त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) स्थान मिळविले. त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाची आता अमेरिकेत दखल घेण्यात आली असून, १३ डिसेंबरला फ्लोरिडातील टाम्पा येथे त्यांना ‘द एशियन हिरो अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com