Messi India Tour 2025: Fans Get 10 Minutes, Political Row Erupts Over Subhashree Ganguly’s Extended Access
ESAKAL
who is Subhashree Ganguly Messi selfie issue? लिओनेल मेस्सी येणार.. येणार.. अन् अखेर तो आज भारतात आला... पहाटे ३:३० च्या सुमारास त्याचे विमान कोलकाता विमानतळावर उतरले... त्याला पाहण्यसाठी एवढ्या सकाळी चाहत्यांनी स्टेडियमबाहेर, रस्त्यांच्या कडेला हजारोच्या संख्येने उपस्थिती लावली होती. यावरूनच सॉल्ट लेक स्टेडियमवर किती गर्दी जमेल याचा अंदाज होताच... १० हजाराहून अधिक किमतीची तिकीटं काढून जवळपास ४०-४५ हजार लोकं स्टेडियममध्ये होती.. ती फक्त मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी, पण घडलं उलटंच... मेस्सी आला अन् १० मिनिटं स्टेडियमवर उपस्थिती दाखवून गेला..