Swara Bhaskar Husband : कोण आहे स्वरा भास्करचा नवरा फहाद अहमद? अनेकदा वादविवादात नाव आलं समोर

तुम्हाला माहिती आहे का तिचा नवरा फहाद अहमद कोण आहे?
Swara Bhaskar Husband
Swara Bhaskar Husbandsakal
Updated on

Swara Bhaskar Husband : बॉलीवुड अभिनेत्री स्वरा भास्करने कोर्ट मॅरेज केले. त्यामुळे सध्या ती चर्चेत आहे. स्वरा भास्करने कधीच तिच्या खाजगी आयुष्याविषयी फार काही सांगितले नव्हते.

मात्र आता तिने लग्न केले आहे त्यामुळे तिचे वैयक्तिक आयुष्याविषयी बरचं काही समोर आलंय पण तुम्हाला माहिती आहे का तिचा नवरा फहाद अहमद कोण आहे? आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. (who is Swara Bhaskar spouse husband Fahad Ahmad read story)

कोण आहे स्‍वरा भास्‍करचा नवरा फहाद अहमद?

स्वरा भास्करचा नवरा फहाद अहमद एक विद्यार्थी नेता आणि सामाजिक कार्यकर्ता आहे. त्याने टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल सायंस स्टूडेंट यूनियनच्या महासचिव रूपात काम केले आहे. जुलै 2022 मध्ये फहादने अबू आसिम आजमी आणि रईस शेखच्या उपस्थितीत समाजवादी पार्टीत प्रवेश केला होता. ते समाजवादी पार्टीच्या महाराष्ट्र आणि मुंबई विभागात युवाजन सभाच्या अध्यक्ष पदावर आहे.

Swara Bhaskar Husband
Bollywood Actress : 'या' बॉलीवूड अभिनेत्री साडीवर दिसतात एकदम झकास

फहाद अहमद याचा जन्म 2 फेब्रुवारी 1992 ला यूपीच्या बहेरीमध्ये झाला. त्याच्या वडिलाचं नाव जि‍रार अहमद आहे. फहादने अलीगढ मुस्लिम यूनिवर्सिटीमधून ग्रॅज्युएशन आणि एम.फिलची डिग्री घेतली.

त्यानंतर ते टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल सायंस, मुंबईच्या सामाजिक कार्यकर्ता म्हणून जोडले. वर्ष 2017 आणि 2018 मध्ये फहादला TISS विद्यार्थी संघाचा महासचिव म्हणून निवडण्यात आले. तो आता डॉक्टरेटचं शिक्षण घेत आहे.

Swara Bhaskar Husband
Actress kajol : छबीदार छबी मी तोऱ्यात उभी...

स्वरा भास्कर विषयी थोडक्यात

स्वरा भास्कर ही बॉलीवुड अभिनेत्री असून गेल्या कित्येक वर्षांपासून ती बॉलीवूडमध्ये काम करत आहे. स्वरा भास्करचा जन्म 9 एप्रिल 1988 मध्ये झाला. तिचे वडिल इंडियन नेवी ऑफिसर होते तर तिची आई ईरा भास्कर ही दिल्लीच्या जेएनयूमध्ये प्रोफेसर होती.

स्वराने 2009 मध्ये करियरची सुरआत केली होती. गुजारीश रांझणा, प्रेम रत्न धनपाओ, वीरे दी वेडिंग, तनु विद्स मनु सारख्या चित्रपटात तिने काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com