उत्तर प्रदेशचा २२वा उत्तराधिकारी कोण?

विधानसभा निवडणुकीनंतर ‘यूपी’ला २२ वा मुख्यमंत्री मिळणार
up election
up electionesakal

नवी दिल्ली : देशातील सर्वांत मोठे व सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य अशी उत्तर प्रदेशची ओळख आहे. या राज्याने एकूण २१ मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ पाहिला आहे. राज्याने नऊ वेळा राष्ट्रपती राजवटही अनुभवली. यावर्षी विधानसभा निवडणुकीनंतर ‘यूपी’ला २२ वा मुख्यमंत्री मिळणार आहे. राज्याची धुरा सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा थोडक्यात परिचय...

उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री - पंडित गोविंद वल्लभ पंत

कारकीर्द : स्वातंत्र्यपूर्व काळात १७ जुलै १९३७ पासून २ नोव्हेंबर १९३९ पर्यंत आणि नंतर १ एप्रिलपासून २५ जानेवारी १९५०पर्यंत संयुक्त प्रदेशाची तर २६ जानेवारी १९५० ते २७ डिसेंबर १९५४

डॉ. संपूर्णानंद -उत्तर प्रदेशचे दुसरे मुख्यमंत्री

२८ डिसेंबर १९५४ ते १० एप्रिल १९५७ आणि १० एप्रिल १९५७ ते ६ डिसेंबर १९६०

चंद्रभानू गुप्ता - चारवेळा कार्यभार सांभाळला

२६ फेब्रुवारी १९६९ ते १७ फेब्रुवारी १९७०, १४ मार्च १९६७ ते २ एप्रिल १९६७, १४ मार्च १९६२ ते १ ऑक्टोबर १९६३ आणि ७ डिसेंबर १९६० ते १४ मार्च १९६२

up election
अपघातात गेली वाचा; कोरोनाची लस घेतली अन् झाला चमत्कार!

चौधरी चरणसिंह -दोन वेळा मुख्यमंत्रिपद सांभाळले

३ एप्रिल १९६७ ते २५ फेब्रुवारी १९६८ आणि १७ फेब्रुवारी १९७० ते १ ऑक्टोबर १९७०.यांची कारकीर्द गाजली.

नारायणदत्त ऊर्फ एन. डी.तिवारी

उत्तर प्रदेश व उत्तराखंड या दोन राज्याचे मुख्यमंत्रिपद एकाच वेळी सांभाळलेले देशातील एकमेव नेते. १९७६ पासून १९८५ या कालवधीत चार वेळा कार्यभार सांभाळला

विश्‍वनाथ प्रतापसिंह - उत्तर प्रदेशच बारावे मुख्यमंत्री

९ जून १९८० ते १८ जुलै १९८२ असा कार्यकाळ

up election
आश्चर्यच! कोरोनाची लस घेतली अन् शरीराला आले चुंबकत्व?

मुलायमसिंह यादव - उत्तर प्रदेशचे १५ वे मुख्यमंत्री

१९८९ ते २००७ या काळात तीन वेळा पदावर

कल्याणसिंह - सोळावे मुख्यमंत्री असलेले कल्याणसिंह यांनी दोन वेळा पद सांभाळले

२४ जून १९९१ ते सहा डिसेंबर १०९२ आणि २१ सप्टेंबर १९९७ ते ११ नोव्हेंबर १९९९बाबरी मशिद पाडली तेव्हा ते मुख्यमंत्री होते.

राजनाथसिंह -उत्तर प्रदेशचे १९ वे मुख्यमंत्री

२८ ऑक्टोबर २००० ते ७ मार्च २००२ असा कार्यकाळ

अखिलेश यादव-

विसावे मुख्यमंत्री म्हणून १५ मार्च २०१२ ते १९ मार्च २०१७ एवढा कालावधी

योगी आदित्यनाथ -उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री

२१ वे मुख्यमंत्री म्हणून २०१७मध्ये धुरा सांभाळली

महिला मुख्यमंत्री

सुचेता कृपलानी- उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री

२ ऑक्टोबर ते ३ मार्च १९६७ कार्यकाळ

मायावती- ‘यूपी’च्या १७ व्या मुख्यमंत्री

१९९५ ते २००३ काळात चार वेळा धुरा सांभाळली

up election
संसद भवन कोरोनाच्या विळख्यात; आणखी 119 कर्मचारी संक्रमित

अन्य मुख्यमंत्री कंसात क्रम

  1. त्रिभुवन नारायणसिंह (सहावे)

  2. कमलापति त्रिपाठी (सातवे)

  3. हेमवतीनंदन बहुगुणा (आठवे)

  4. राम नरेश यादव (दहावे)

  5. बाबू बनारसी दास (अकरावे)

  6. श्रीपती मिश्रा (तेरावे)

  7. वीर बहादूरसिंह (चौदावे)

  8. राम प्रकाश गुप्ता (अठरावे)

up election
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कोरोना पॉझिटिव्ह

उत्तर प्रदेश निवडणुकीत ८०-२० सारख्या गोष्टी करणे म्हणजे फसवणूक करून युवकांचे लक्ष मुळ मुद्यापासून विचलित करण्यासारखे आहे. वास्तविक भाजप सरकारमध्ये प्रत्येकी शंभर लोकांपैकी ६८ जणांकडे काम नाही. माझ्या युवा मित्रांनो, यंदाच्या निवडणुकीत रोजगार, शिक्षण यासारख्या मुद्द्यांना महत्त्व द्या. काँग्रेस पक्षाकडून उत्तर प्रदेशात नवीन रणनीती आखली जात आहे. या रणनितीत महिला, शेतकरी, युवक आणि सर्वसामान्यांचे मुद्दे केंद्रस्थानी आहेत.

- प्रियांका गांधी, कॉंग्रेस नेत्या

up election
'मोदींच्या दौऱ्याआधीच पंजाब पोलिसांना होती आंदोलनाची माहिती'

स्वामी प्रसाद मौर्य यांनी कोणत्या कारणांमुळे राजीनामा दिला, हे आपल्याला ठावूक नाही. आपण एकत्र येऊन चर्चा करू, असे आपण आवाहन करतो. घाईगडबडीत घेतलेले निर्णय हे अनेकदा चुकीचे ठरले आहेत.

- केशव प्रसाद मौर्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com