Atique Ahmed: गँगस्टर अतिक अहमद अन् त्याच्या भावावर कोणी झाडल्या गोळ्या? नावं आली समोर

बोलता बोलता अचानक डोक्यात बसली गोळी
Atique Ahmed
Atique Ahmed

उत्तर प्रदेशमधील कुख्यात गुंड अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर हल्ला करणाऱ्या तिघांनी स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केलं. या तिन्ही आरोपींनी अतिक, अशरफ यांची हत्या का केली, यामागे त्यांचा काय हेतू होता, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, त्यांच्या नावाची चर्चा होत आहे. (Who killed Atiq Ahmed and brother Ashraf 3 names investigation )

मिळालेल्या माहितीनुसार, हल्ला करणारे तीनही तरुण माध्यम प्रतिनिधी बनून आले होते, असे बोलले जात आहे. लवलेश, सन्नी आणि अरुण अशी नावं हल्ला करणाऱ्या तिघांची असल्याचे सांगण्यात येत आहे.

Atique Ahmed
Asad Ahmed : असद अहमदचा बंदोबस्तात अंत्यविधी

अतीक अहमद आणि अश्रफच्या हत्येनंतर, त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात असलेल्या 17 पोलील कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. याच बरोबर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारी निवासस्थानाची सुरक्षाही वाढविण्यात आली आहे.

याशिवाय, अतिक आणि अश्रफच्या हत्येनंतर, प्रयागराजमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने कलम 144 लागू करण्यात आले आहे. याच बरोबर परिसरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

Atique Ahmed
Atique Ahmed : टांगेवाल्याचा मुलगा ते कुख्यात गुंड

गँगस्टर अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांची पोलीस बंदोबस्तात असतानाही खुलेआम हत्या करण्यात आली आहे. पोलीस या दोन्ही गँगस्टर भावांना वैद्यकीय चाचणीसाठी घेऊन जात होते. वाटेत माध्यमांशा हे दोन्ही गुन्हेगार बोलत असताना अचानक एकाने अतिकच्या थेट डोक्यात गोळी झाडली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर अशरफवर तिघांनी पिस्तुलीतून बेछूट गोळीबार केला. यात अतिक आणि अशरफ दोघेही ठार झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com