

Indigo Airline Dispute
ESakal
देशातील सर्वात मोठ्या विमान कंपन्यांपैकी एक असलेली इंडिगो सध्या मोठ्या संकटाचा सामना करत आहे. देशभरात कंपनीच्या विमानांची उड्डाणे रद्द केली जात आहेत. देशांतर्गत बाजारपेठेचा ६० टक्क्यांहून अधिक हिस्सा असलेली ही कंपनी सध्या ऑपरेशनल संकटाचा सामना करत आहे. ज्यामुळे तिची प्रतिष्ठा खराब होत आहे. त्यामुळे नुकसान होत आहे. मंगळवार आणि बुधवारी २०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. अशातच इंडिगो कंपनी कोण चालवतं? तसेच सध्या एअरलाइनला का समस्या येत आहेत? हे सविस्तरपणे समजून घेऊया.