PM मोदींच्या जेवणाचा खर्च कोण करतं? RTI मधून माहिती आली समोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Narendra Modi

PM मोदींच्या जेवणाचा खर्च कोण करतं? RTI मधून माहिती आली समोर

नवी दिल्ली : पंतप्रधानपदी विराजमान असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या जेवणाचा अर्थात खानपानाचा खर्च कोण करत असेल? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. पंतप्रधान कार्यालयानं खानपानाबाबत माहिती दिली आहे. माहिती अधिकार कायदा अर्थात RTI मार्फत ही माहिती मागवण्यात आली होती. (Who pays for PM Modi food information came out through RTI)

पंतप्रधान कर्यालयानं माहिती देताना सांगितंल की, पंतप्रधानांच्या खानपानावर सरकारी तिजोरीतून खर्च होत नाही. पंतप्रधान म्हणतात की सक्षम व्यक्तींनी आपला खर्च स्वतःच उचलू नये तर गरजवंतांच्या मदतीसाठी पुढे यावं. PM मोदींनी कोरोनाच्या काळात गरीबांसाठी मोफत गहू-तांदूळ वितरणाची व्यवस्था केली होती.

PM मोदींच्या आवाहनावर आर्थिक संपन्न लोकांनी घरगुती गॅस सिलेंडरवर मिळाणारं अनुदान स्वेच्छेनं सोडलं होतं. स्वतः पंतप्रधानही ही गोष्ट फॉलो करतात. पंतप्रधान मोदींच्या कपड्यांवरील खर्चाबाबतही एक आरटीआय दाखल करण्यात आलं होतं. त्यावर पीएमओनं म्हटलं होतं की, पंतप्रधान स्वतः आपल्या कपड्यांचा खर्च करतात.

आरटीआय अंतर्गत पीएमओकडे विचारणा करण्यात आली होती की, पंतप्रधान आपल्या जेवणावर किती खर्च करतात? त्यावर उत्तर देण्यात आलं की, त्यांच्या जेवणासाठी सरकारी खर्च होत नाही. तर पंतप्रधान निवासस्थानाची देखभाल केंद्रीय लोकनिर्माण विभागामार्फत केली जाते. तर वाहनांची जबाबदारी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपवर (एसपीजी) असते. आरटीआयमध्ये मोदींचा पगार आणि भत्त्याबाबतही माहिती विचारण्यात आली होती. पण यावर उत्तर देताना नियमांचा हवाला देत वेतनाची माहिती न देता पगारवाढ नियमानुसार केली जात असल्याचं म्हटलं आहे.

संसदेच्या कॅन्टिनमध्ये पंतप्रधानांनी स्वतः केलं पेमेंट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ मार्च २०१५ रोजी बजट सेशनमध्ये संसद भावनाच्या कॅन्टिनमध्ये जात सर्वांना धक्का दिला. असं पहिल्यांदाच घडत होतं की पंतप्रधानांनी कॅन्टिनमध्ये जेवण केलं होतं. त्यांनी इथं पाणी देखील कॅन्टिनचं प्यायलं होतं. त्यांनी शाकाहारी जेवणाची थाळी घेत २९ रुपये अदा देखील केले होते.

टॅग्स :Narendra ModiPMODesh news