Luv Agrawal
Luv Agrawal ANI

कोरोनाबाबत नागरिक हलगर्जी; आरोग्य मंत्रालय म्हणतंय...

ओमिक्रॉनच्या रूग्णांमध्ये कोणतेही गंभीर लक्षणे आढळून आलेली नाही.

नवी दिल्ली : कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे (Corona New Variant Omicron) संपूर्ण जग ढवळून निघाले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून नागरिकांमध्ये बेफिकीरी वाढू लागली आहे, ही अत्यंत चिंतेची बाब आहे, असे मत आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी शुक्रवारी व्यक्त केले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (Lav Agarwal On Omicron Variant)

व्यापक लसीकरण झाल्यामुळे लोकांमध्ये करोनाबाबतच्या नियमाकडे काहीसं दुर्लक्ष करण्याची वृत्ती दिसून येऊ लागली आहे. अलीकडच्या काळात नागरिकांकडून कोरोना प्रोटोकॉलचे (People not following covid protocol) पालन करण्यात मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा केला जात आहे. भारतामध्ये मास्कचा वापर (Mask) सुमारे 60 टक्क्यांपर्यंत खाली गेला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीयांना नीती आयोग आणि करोनाबाबतच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी गंभीर इशारा दिला आहे.(NITI Aayog Member Dr VK Paul)

Luv Agrawal
59 देशांत 2936 रुग्ण; Omicron Variant संदर्भात आरोग्य मंत्रालयाची माहिती

सध्या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटची प्रकरणे समोर येत आहेत, परंतु अद्याप यातून कोणत्याही गंभीर प्रकरणांची पुष्टी झालेली नाही. मात्र, नागरिक अशाच पद्धतीने हलगर्जी राहणार असतील तर, हा देशासाठी धोक्याचा इशारा आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीला जी स्थिती होती, त्याच स्थितीत आपण आल्याचे सांगत अनेकांना सोशल डिस्टन्सिंगचाही विसर पडल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोनाचे रूग्ण जरी कमी झाले असले, तरी संसर्गाचा धोका पूर्णपणे संपलेला नसल्याचे यावेळी आरोग्य मंत्रालयातर्फे सांगण्यात आले.

सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान सामाजिक अंतर आणि कोरोनासंबंधित प्रोटोकॉलचे पालक करणे गरजेचे आहे. ओमिक्रॉनच्या नवीन व्हेरिएंटचा धोका कायम असून मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि लसीकरण हेच कोरोनाविरुद्धच्या लढाईतील सर्वात मोठे शस्त्र असल्याचे आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com