
Naxal leader Ramachandra Reddy alias Chalapati : ओडिशा-छत्तीसगढच्या सीमेवर सुरक्षा दलांसोबत झालेल्या गोळीबारात नक्षलवादी प्रताप रेड्डी उर्फ रामचंद्र रेड्डी उर्फ चलपती याचा मृत्यू झाला आहे. ३६ तास चाललेल्या या ऑपरेशनमध्ये एकूण १६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. यात चलपतीचाही समावेश आहे. त्यांच्यावर १ कोटी रुपयांचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं.