

Latest Dehli News: आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांच्याकडे मंगळवारी भेटीसाठी वेळ मागितली असून या भेटीवेळी ते मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे ‘आप’ सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. केजरीवाल यांनी सक्सेना यांच्याकडे सायंकाळी साडेचार वाजताची वेळ मागितली आहे. तत्पूर्वी सकाळी ११ वाजता ‘आप’ आमदारांची बैठक होणार असून या बैठकीत मुख्यमंत्रिपदाचा नवा उमेदवार निवडला जाणार आहे.
मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात गंभीर आरोप झालेल्या केजरीवाल यांना अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने विविध अटी घालत जामीन दिला आहे. त्यानंतर दोन दिवसानंतर केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार केजरीवाल मंगळवारी पदाचा राजीनामा देणार आहेत.