थरूरजी, या इंडिया गांधी कोण?; नेटिझन्सकडून ट्रोल

वृत्तसंस्था
Tuesday, 24 September 2019

थरूर यांनी जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांचा 1954 मध्ये केलेल्या अमेरिका दौऱ्याचा फोटा शेअर करत ट्विट केले आहे, की नेहरू आणि इंडिया गांधी 1954 मध्ये अमेरिकेत गेले होते. माध्यमांमध्ये कोणतीही प्रसिद्धी न करता त्यांना अमेरिकन नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. 

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते शशी थरूर त्यांच्या एका ट्विटवरून चांगलेच ट्रोल झाले आहेत. थरूर यांनी इंदिरा गांधी यांच्याऐवजी इंडिया गांधी असे लिहिल्याने त्यांना या इंडिया गांधी कोण असा प्रश्न विचारण्यात आला आहे.

लोकसभा सदस्य असलेल्या थरूर यांच्याकडून अशा चुकीची अपेक्षा नाही. सोशल मीडियावर ते कायम चर्चेत असतात. आता त्यांनी केलेल्या चुकीमुळे नेटिझन्सकडून त्यांना ट्रोल करण्यात येत आहे. थरूर यांनी जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांचा 1954 मध्ये केलेल्या अमेरिका दौऱ्याचा फोटा शेअर करत ट्विट केले आहे, की नेहरू आणि इंडिया गांधी 1954 मध्ये अमेरिकेत गेले होते. माध्यमांमध्ये कोणतीही प्रसिद्धी न करता त्यांना अमेरिकन नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. 

थरूर यांनी इंदिराऐवजी इंडिया लिहिल्याने त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत. इंडियासह इंदिरा हा शब्द सध्या ट्रेंडमध्ये आहे. अशोक पंडीत यांनी म्हटले आहे, की थरूर साहेब सध्या इंडियात गांधी परिवार राहिलेला नाही. नेहरु आणि इंदिरा गांधींचा मॉस्कोमधील फोटो तुम्ही अमेरिकेतील असल्याचे दाखविले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Whos India Gandhi? Netizens Question Shashi Tharoors Gaffe on Twitte