Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या कथित अबकारी कर घोटाळा प्रकरणी ईडीनं अटक केली आहे.
arvind kejriwal and supreme court
arvind kejriwal and supreme courtsakal

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या कथित अबकारी कर घोटाळा प्रकरणी ईडीनं अटक केली आहे. यामुळं गेल्या महिन्याभरापासून केजरीवाल हे तुरुंगात आहेत. आता याच प्रकरणात सुनावणीदरम्यान केजरीवाल यांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? असा सवाल सुप्रीम कोर्टानं ईडीला विचारला आहे. (Why Arvind Kejriwal arrested before elections Supreme Court asks ED to respond)

arvind kejriwal and supreme court
Sharad Pawar: अस्वस्थ आत्म्यापासून सुटका करुन घ्या म्हणणाऱ्या PM मोदींना शरद पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, हे खरं आहे पण...

अरविंद केजरीवाल हे सध्या तुरुंगातूनच दिल्लीचा कारभार हाकत आहेत. आपल्याविरुद्ध षडयंत्र रचल्याचा आरोप करत आपण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. पण आपल्याला झालेली अटक आणि तुरुंगवास ही बेकायदा असून ईडीच्या कारवाईला आव्हान देणारी याचिका केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. या याचिकेवर न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. (Latest Marathi News)

arvind kejriwal and supreme court
Arvind Kejriwal : केजरीवालांना अटक, पुढे काय? सुनीता केजरीवाल मुख्यमंत्री होतील का? 'या' नेत्यांकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या

न्या. खन्ना म्हणाले, "स्वातंत्र्य अत्यंत महत्त्वाचे आहे, तुम्ही ते नाकारू शकत नाही. शेवटचा प्रश्न हाच आहे की सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी केजरीवालांवर अटकेची कारवाई का करण्यात आली?" याकडेही त्यांनी लक्ष वेधलं आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टानं ईडीला यावर उत्तर देण्यास सांगितलं आहे. वारंवार समन्स पाठवल्यानंतरही विशिष्ट काळानंतरच केजरीवालांविरोधात कारवाईला वेग का आला? असा सवालही यावेळी न्या. खन्ना यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com