CJI Chandrachud Cautions CBI: 'देशविरोधी गुन्ह्यांवरच तपास संस्थांनी लक्ष द्यावं', न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा CBIला सल्ला

CJI Chandrachud Cautions CBI: केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात न्या. चंद्रचूड यांनी तपास संस्थांना त्यांच्यासमोरील आव्हानांचीही जाणीव करून दिली.
CJI Chandrachud Cautions CBI
CJI Chandrachud Cautions CBIesakal

नवी दिल्ली: ‘‘देशातील प्रमुख तपास संस्थांना त्यांच्याकडील मूळ जबाबदारीच्या तुलनेत कमी महत्त्वाच्या प्रकरणांवर काम करावे लागत आहे. त्यांनी केवळ देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या आणि देशाच्या विरोधात गुन्हा घडल्याच्या प्रकरणांवरच लक्ष केंद्रित करावे,’’ असा सल्ला सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आज तपास संस्थांना दिला.

केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात न्या. चंद्रचूड यांनी तपास संस्थांना त्यांच्यासमोरील आव्हानांचीही जाणीव करून दिली. न्या. चंद्रचूड म्हणाले,‘‘भ्रष्टाचाराविरोधात तपास करणे या मूळ भूमिकेपेक्षा वेगळ्या असलेल्या विविध गुन्हेगारी प्रकरणांचा तपास करण्याचे काम सीबीआयला सांगितले जात आहे.

आपल्या ध्येयाची पूर्तता करण्याची मोठी जबाबदारी या संस्थेवर आहे. या जबाबदारीचा फारच विस्तार केला गेला आहे. मात्र, तपास संस्थांनी केवळ राष्ट्रीय सुरक्षेला आव्हान देणाऱ्या आणि देशाविरोधात आर्थिक गुन्हे करणाऱ्या प्रकरणांवरच आपले लक्ष केंद्रित करावे. गुन्हेगार आता तंत्रज्ञानाचाही मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. त्यामुळे सीबीआयसह सर्व तपास संस्थांनी या आव्हानाचाही विचार करावा.’’ सीबीआयमध्ये अनेक अधिकारी प्रतिनियुक्तीवर आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

CJI Chandrachud Cautions CBI
Inalienable Part Of India : अरुणाचलच्या ३० ठिकाणांना चिनी नावे ; चीन सरकारची पुन्हा कुरापत,भारताने फेटाळला दावा

‘तपास प्रक्रियेचे डिजिटायझेशन करा’

तपास संस्थांसमोर गुन्हेगारीच्या बदलत्या स्वरूपाचे आव्हान असले तरी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी त्यावर तोडगाही सुचविला. ‘‘तपास संस्थांनी तपास प्रक्रियेचे डिजिटायझेशन करावे आणि त्याची सुरुवात प्राथमिक गुन्हे अहवाल (एफआयआर) नोंदविण्यापासूनच करावी. तक्रारींची प्रचंड संख्या पाहता तपासाला होणारा विलंब टाळण्यासाठी तंत्रज्ञानाचा आधार घ्यायलाच हवा.

‘एआय’ आणि इतर तंत्रज्ञानाबाबत अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळा घेतल्या जाव्यात,’’ असे ते म्हणाले. तपास संस्थांच्या रचनेतही सुधारणा आवश्‍यक असल्याचे मत न्या. चंद्रचूड यांनी व्यक्त केले.

CJI Chandrachud Cautions CBI
NCP Sharad Pawar : पवार गट हरियानात लढण्याच्या प्रयत्नात ; शरद पवार-खर्गे यांची भेट,कर्नालमध्ये वर्मा यांना उमेदवारी शक्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com