esakal | देशात कोरोना रुग्णांची संख्या का वाढतेय? तज्ज्ञांनी सांगितली 4 कारणं

बोलून बातमी शोधा

Corona_55

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.  मंगळवारी देशभरात १ लाख ६१ हजार ७३६ नवे कोरोना रुग्ण आढळून आले

देशात कोरोना रुग्णांची संख्या का वाढतेय? तज्ज्ञांनी सांगितली 4 कारणं
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.  मंगळवारी देशभरात १ लाख ६१ हजार ७३६ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या १ कोटी ३६ लाख ८९ हजार ४५३ झाली आहे. सोमवारी दिवसभरात ८७९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत १ लाख ७१ हजार ५८ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. विशेषत:काही राज्यांमध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र, पंजाब आणि दिल्लीसारख्या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. अनेक राज्यांमध्ये कठोर निर्बंध लादण्यात आलेत, शिवाय महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये लॉकडाऊन करण्याचा विचार सुरु आहे. अशात एक प्रश्न निर्माण होतोय की देशात कोरोना रुग्णांची संख्या का वाढत आहे. तज्त्रांनी रुग्णसंख्या वाढण्यामागील चार प्रमुख कारणे सांगितली आहेत. 

चार प्रमुख कारणे

१ कोरोना रुग्णसंख्या वाढण्यामागील एक महत्त्वाचं कारण नवा म्युटन्ट आहे. देशात नव्या म्युटन्टचा शिरकाव झाला असून एकूण रुग्णसंख्येपैकी २० टक्के रुग्ण या नव्या म्युटन्टने बाधित असल्याचं सांगितलं जातंय. प्रामुख्याने महाराष्ट्रात हा म्युटन्ट आढळून आला आहे. याच कारणामुळे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात रुग्णसंख्या जास्त असल्याचं व्हायरोलॉजिस्ट शाहीद जमील यांनी पीटीआयला बोलताना सांगितलं. 

लॉकडाऊनसंदर्भात मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचं मोठं वक्तव्य

२ कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुन्हा सर्व सुरु करण्यात आलं. त्यावेळी काहीही खबरदारी घेण्यात आली नाही. आता कोरोना महामारी गेली, ती परत येणार नाही अशीच मानसिकता लोकांची तयार झाली होती. शिवाय दुसऱ्या लाटेमध्ये संसर्गाचा वेग दुप्पट आहे. निर्बंध शिथिल करण्याचा हा परिणाम असल्याचं सांगितलं जातंय. 

३. देशात लसीकरणाची गती कमी आहे, असं मत जमील यांनी व्यक्त केलंय. अनेकजणांमध्ये लशीबाबत साशंकता आहे. त्यामुळे पात्रता असूनही आरोग्य कर्मचारी आणि ४५ वर्ष वयांपुढील व्यक्तींनी कोरोनाची लस घेण्यास नाखूषी दर्शवली आहे. देशातील सध्या ०.७ टक्के लोकांनी कोरोनावरील दोन्ही डोस घेतले आहेत, तर ५ टक्के लोकांनी पहिला डोस घेतला आहे. त्यामुळे लसीकरणाची गती वाढवण्याची गरज आहे. 

सरकार बदलण्याच्या मुद्द्यावर संजय राऊतांचे फडणवीसांना उत्तर

४. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, देशातील २० ते ३० टक्के लोक ज्यांना कोरोनाची बाधा झाली होती, त्यांनी सहा महिन्याच्या कळात इम्युनिटी गमावली आहे. त्यामुळे त्यांना दुसऱ्यांना कोरोनाची लागण होत आहे. एप्रिल महिना कोरोना संसर्गाचा पीक असल्याचं सांगितलं जातंय. त्यानंतर रुग्णांच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे.