esakal | 'जवानांना सीमेवर निःशस्त्र का पाठवले? जबाबदार कोण?'
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi

भारत-चीन सीमारेषेवर गलवान खोऱ्यात सोमवारी (ता. 15) झालेल्या संघर्षामध्ये 20 जवान हुतात्मा झाले आहेत. जवानांना सीमेवर निःशस्त्र का पाठवले? याला जबाबदार कोण? असा प्रश्न काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटवरून आज (गुरुवार) उपस्थित केला आहे.

'जवानांना सीमेवर निःशस्त्र का पाठवले? जबाबदार कोण?'

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारत-चीन सीमारेषेवर गलवान खोऱ्यात सोमवारी (ता. 15) झालेल्या संघर्षामध्ये 20 जवान हुतात्मा झाले आहेत. जवानांना सीमेवर निःशस्त्र का पाठवले? याला जबाबदार कोण? असा प्रश्न काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटवरून आज (गुरुवार) उपस्थित केला आहे.

जवान हुतात्मा झाल्याचा फोन आला; पण तसं नाही...

राहुल गांधी यांनी एका माजी अधिकाऱ्याच्या मुलाखतीचा उल्लेख करत ट्विट केले आहे. ट्विटला 'कौन ज़िम्मेदार है?' असे शीर्षक देताना त्यांनी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. चीनची एवढी हिम्मत का आणि कशामुळे झाली? जवानांना निःशस्त्र का पाठवण्यात आले ? असे प्रश्न उपस्थित केले आहेत.

राहुल गांधी यांनी या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. या सर्व प्रकरणावर पंतप्रधान शांत का आहेत तसेच ते लपून का बसले आहेत? असा प्रश्न त्यांनी विचारला होता. याच बरोबर त्यांनी, आपल्या जमिनीवर चीनकडून हक्क का दाखवण्यात येत आहे. आपल्या भागात घुसण्याची हिम्मत का होते? या सर्व प्रश्नाची उत्तरे पंतप्रधानांनी द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली होती. दरम्यान, भारत-चीन सीमारेषेवर गलवान खोऱ्यात सोमवारी झालेल्या संघर्षामध्ये 20 जवान हुतात्मा झाले असून, चीन सैन्याच्या कमांडिंग ऑफिसरसह 43 जणांचा मृत्यू झाला आहे. लडाख भागातील पेनगॉंग सो येथे 5 मे पासून वाद सुरू आहे.

घरात लग्नाची तयारी सुरू असताना आलं वीरमरण...

loading image