Amit Shah: फाळणीवेळी पाकिस्तानमध्ये 21 टक्के हिंदू, आता...; CAA बाबत अमित शाहांनी स्पष्ट केली भूमिका

Amit Shah clarified BJPs position on CAA: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सीएएबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
amit shah
amit shah

नवी दिल्ली- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सीएएबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षासाठी हा राजकीय मुद्दा नाही. पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानमधील पीडित लोकांना न्याय देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. विरोधकांना काही काम नाही त्यामुळे ते शंका उपस्थित करत असतात. काँग्रेस जे बोलते ते करत नाही. भाजप जे बोलतो ते करतो. मोदी जे बोलतात ते काळ्या दगडावरची रेष आहे, असं शाह म्हणाले.

४१ वेळा मी सीएएबाबत बोललो आहे. देशातील अल्पसंख्याक किंवा इतरांना घाबरण्याचं कारण नाही. कारण, सीएएमध्ये लोकांचे नागरिकत्व जाणार नाही. तीन देशातील सहा धर्माच्या लोकांना न्याय देण्याचं आम्ही काम करत आहोत. सीएए लागू होणार हे आधीच सांगितलं होतं. विरोधासाठी केवळ याला विरोध केला जात आहे, असं शाह म्हणाले. (Why is CAA being implemented Amit Shah clarified BJPs position with statistics)

amit shah
Vijay On CAA Act : 'तामिळनाडूमध्ये सीएए लागू करु नका, हा कायदा म्हणजे....', साऊथचा सुपरस्टार विजय संतापला!

फाळणीला आमचा विरोध होता. धर्माच्या नावावर फाळणी करणे आम्हाला मान्य नाही. फाळणीच्या वेळी लाखो लोक भारतात आले. काही लोक तिथेच राहिले. काँग्रेसने तेव्हा आपल्या अनेक मंचावरुन लोकांना अश्वस्थ केलं होतं की, सध्या हिंसा सुरु असल्याने जेथे आहात तेथे थांबा. त्यानंतर तुम्हाला देशाचे नागरिकत्व देण्यात येईल असं सांगण्यात आलं. पण, काँग्रेसने आपलं आश्वासन पूर्ण केलं नाही, असं ते म्हणाले.

मुस्लिमांचा समावेश का नाही?

मुस्लिमांचा वेगळा देश असावा या कारणासाठीच आज पाकिस्तान भारताचा भाग नाही. तसं पाहिलं तर जगात ते लोक अव्यवस्थेत आहेत त्या सर्वांसाठी भारताचे दरवाजे खोलायला हवेत का? मग भारत राहील का? अखंड भारताचे जे भाग होते आणि त्यांच्यावर धार्मिक अत्याचार झाले आहेत. त्यांना न्याय देणे ही नैतिक आणि संविधानिक जबाबदारी असल्याचं मी मानतो, असं शाह म्हणाले.

पाकिस्तानमधील हिंदू

फाळणी झाली तेव्हा पाकिस्तानमध्ये २३ टक्के हिंदू होते. आता सध्या ३.७ टक्के राहिले आहेत. इतके सारे लोक कुठे गेले. एवढे लोक तर भारतात आले नाहीत. या लोकांचं धर्मपरिवर्तन झालं. त्यांना अपमानित करण्यात आलं, दुय्यम नागरिक ठरवण्यात आलं. हे लोक कुठे जाणार? याचा विचार आपल्याला करावे लागेल, असं शाह म्हणाले.

amit shah
CAA : 'मोदीजींनी भारतामध्ये सीएए कायद्याबाबत जे केलं ते...'आफ्रिकन अमेरिकनं अभिनेत्री मेरी काय म्हणाली?

बांगलादेशमधील हिंदू

बांगलादेशच्या १९५१ च्या जनगणनेनुसार नुसार, हिंदूंची संख्या २२ टक्के होते, आता २०११ च्या जनगणनेनुसार त्यांची संख्या १० टक्के राहिली आहे. अफगाणिस्तानमध्ये २ लाख हिंदू आणि शीख होते. आता केवळ ते पाचशेपर्यंत राहिले आहेत. हे सगळे आपले बांधव आहेत, असं शाह म्हणाले. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com