Vijay On CAA Act : 'तामिळनाडूमध्ये सीएए लागू करु नका, हा कायदा म्हणजे....', साऊथचा सुपरस्टार विजय संतापला!

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता थलापती विजयनं सीएए कायद्यावरुन महत्वाची भूमिका मांडली आहे.
Thalapathy Vijay latest News
Thalapathy Vijay latest Newsesakal

CAA Act Thalapathy Vijay Comment : देशभरामध्ये आज पासून नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू होण्याविषयीच्या हालचालींना वेग आला होता. आता हा कायदा देशभरामध्ये लागू करण्यात आला असून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहेत. अशातच प्रसिद्ध दाक्षिणात्य सेलिब्रेटी थलापती विजयच्या प्रतिक्रियेनं चर्चेला उधाण आले आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं देशभरामध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करणार याची घोषणा केली होती. सीएए हा २०१९ लोकसभा निवडणूकीतील एक मुख्य मुद्दा होता असे बोलले जात होते. त्यानंतर आता त्याची अंमलबजावणी केली गेली आहे. या सगळ्याचे मनोरंजन विश्वातही पडसाद उमटले आहेत. एकीकडे प्रसिद्ध आफ्रिकन अमेरिकन अभिनेत्री गायिका मेरीनं मोदींचे कौतुक केले आहे. तर दुसरीकडे अभिनेता थलापती विजयनं त्यावरुन नाराजी व्यक्त केली आहे.

विजयनं हा कायदा स्विकारता येणार नाही. असे म्हटले आहे. त्यानं सोशल मीडियावर पोस्ट करत हा कायदा तामिळनाडू मध्ये लागू करु नये यासाठी त्यानं पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. विजय हा आता अभिनेत्याबरोबरच तमिळगा वेट्री कडगम (टीवीके) पक्षाचा नेता देखील आहे. थलापतीनं नागरिकता सुधारणा कायदा २०२९ याला विरोध केला आहे. हा कायदा स्विकारता येणार नसून तामिळनाडू मध्ये लागू करण्यात येऊ नये असे आवाहनही विजयनं केले आहे.

Thalapathy Vijay latest News
Oscar 2024 : एम्मा ते मार्गोटच्या रेड कार्पेट लूकची चर्चा! कॅमेऱ्यांचा क्लिकक्लिकाट अन् चाहत्यांच्या प्रतिक्रियांना उधाण

विजयनं त्याची पार्टी टीवीकेच्या अधिकृत अकाउंटवरुन पत्र पोस्ट केले आहे. तो म्हणतो, भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा २०१९ (सीएए) सारखे कायदे सध्याच्या वातावरणात लागू करता येणार नाही. ते स्विकारण्यासारखे नाही. ज्या देशात सगळ्या जाती धर्माची लोकं गुण्या गोविंदानं राहतात तिथं नेत्यांनी अशा प्रकारचे कायदे का लागू केले जात आहेत. असा प्रश्न विजयनं उपस्थित केला आहे.

तामिळनाडूमधील नेत्यांनी मी आवाहन करतो की, हा कायदा आपल्या राज्यात लागू होणार नाही याची काळजी आणि विचार त्यांनी करावा. विजयच्या राजकीय पक्षाविषयी बोलायचं झाल्यास त्यानं २ फेब्रुवारी रोजी तमिळगा वेट्री कझम नावाच्या पक्षाची घोषणा केली होती. त्यावेळी त्यानं म्हटलं होतं की, आम्ही काही २०२४ ची निवडणूक लढवणार नाही. कोणत्या पक्षाचा भागही होणार नाही. आम्ही सध्या केवळ एक राजकीय पक्ष आणि भूमिकेचा विचार करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com