मोदी पळ का काढत आहेत? : शीला दीक्षित

पीटीआय
बुधवार, 28 डिसेंबर 2016

सहारा डायरी प्रकरण; स्वतःवरील आरोप फेटाळले

नवी दिल्ली - सहारा डायरी प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करावी, या मागणीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी का पळ काढत आहेत, असा सवाल काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांनी उपस्थित केला असून, या प्रकरणी स्वतःवर झालेले आरोपही फेटाळून लावले आहेत.

"मला जे सांगायचे होते ते मी सांगितले. आता चेंडू पंतप्रधान कार्यालय व इतरांच्या कोर्टात आहे. मोदी याचे उत्तर देऊन या प्रकरणातून सहीसलामत बाहेर पडतील का?'' असे ट्विट शीला दीक्षित यांनी केले आहे. या प्रकरणाशी दीक्षित यांचेही नाव जोडले गेले असून, त्यामुळे कॉंग्रेसमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, आपला या प्रकरणाशी काडीमात्र संबंध नसून, झालेले सर्व आरोप खोटे आहेत, असे दीक्षित यांनी म्हटले आहे.

या वादमुळे उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातून दीक्षित यांनी अंग काढून घेतले. त्या आता मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारही राहिल्या नाहीत. अशा बातम्या खोट्या आहेत. अलिगड येथील प्रचार दौऱ्यात आपला सहभाग नव्हता, कारण तसे नियोजनही नव्हते. आपण उद्या बाराबंकी येथे प्रचार करणार असल्याचे दीक्षित यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Why Modi running: Sheela Dixit