पंतप्रधानांना वेळ नसेल तर तुम्हीच करा उद्घाटन - सर्वोच्च न्यायालय

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 मे 2018

29 एप्रिल रोजी या महामार्गाचे उद्धाटन होणार होते. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटक निवडणुकाच्या प्रचारात व्यस्त असल्याने उद्घाटनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता 31 मे पर्यंत जर या महामार्गाचे उद्घाटन झाले नाही तर 1 जून पासून हा महामार्ग नागरिकांसाठी खुला करण्याचे आदेश दिले आहेत.

नवी दिल्ली - ईस्टर्न एक्सप्रेसच्या उद्घाटनासाठी होणारा विलंब पाहून सर्वोच्च न्यायालयाने या एक्सप्रेसवेचे उद्घाटन करण्याचे आदेश दिले आहेत. या महामार्गाच्या उद्घाटनासाठी जर पंतप्रधानांकडे वेळ नसेल तर तुम्हीच त्याचे उद्घाटन करा असे सर्वोच्च न्यायलयाने नॅशनल हायवे आॅथॉरिटी ऑफ इंडियाला आदेश दिले आहेत. 

एक्सप्रेसवेसाठी तुम्ही पूर्ण मेहनत घेतली आहे. मग तूम्हीच उद्धाटन करा आणि हा मार्ग येत्या 1 जूनपासून नागरिकांसाठी खुला करा असे न्यायालयाने म्हटले आहे. ईस्टर्न एक्सप्रेसवेचे काम पूर्ण होऊनही हा मार्ग नागरिकांसाठी खुला केला जात नसल्याची याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर सर्वोच्च न्यायलयाने आदेश दिले आहेत. 

29 एप्रिल रोजी या महामार्गाचे उद्धाटन होणार होते. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटक निवडणुकाच्या प्रचारात व्यस्त असल्याने उद्घाटनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता 31 मे पर्यंत जर या महामार्गाचे उद्घाटन झाले नाही तर 1 जून पासून हा महामार्ग नागरिकांसाठी खुला करण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: why wait for pm to inaugurate it says upset supreme court about major freeway