Republic Day: जाणून घ्या प्रजासत्ताक दिनाचा इतिहास आणि 10 रंजक गोष्टी

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 26 January 2021

प्रजासत्ताक दिन दरवर्षी 26 जानेवारीला साजरी केला जातो.

Republic Day 2021- प्रजासत्ताक दिन दरवर्षी 26 जानेवारीला साजरी केला जातो. यादिवशी 1950 ला भारत सरकारने अधिनियम 1935 ला हटवून देशात संविधान लागू केले होते. 26 जानेवारी 1949 ला भारताने संविधान स्वीकारले, पण 26 जानेवारी 1950 पासून ते लागू करण्यात आले. यादिवशी पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 21 तोफांच्या सलामीसह भारताला संपूर्ण प्रजासत्ताक राष्ट्र घोषित केलं होतं.  

30 डिसेंबर 1929 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची लाहौरमध्ये एक बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थाळी पंडित जवाहरलाल नेहरु होते. या बैठकीत 26 जानेवारीला स्वतंत्रता दिवस म्हणून साजरा करण्याची शपथ घेण्यात आली होती, जेणेकरुन इंग्रजांकडून पूर्ण स्वातंत्र्य मिळवण्याचा संकल्प करता येईल. 26 जानेवारी 1930 ला पूर्ण स्वराज्य दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

मजुराची तीन वर्षांची कमाई मुकेश अंबानी कमावतात अवघ्या सेकंदात

भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 ला झाली. या बैठकीचा उद्देश देशाला एक संविधान देण्याचा होता. अनेक चर्चा, शिफारशी, वावविवादानंतर संविधानाला अंतिम रुप देण्यात आले. तीन वर्षानंतर 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान बनून तयार झाले. पण, 26 जानेवारीचे औचित्य साधून ते लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

प्रजासत्ताक दिनासंबंधी रंजक गोष्टी

- 26 जानेवारी 1950 ला सकाळी 10 वाजून 18 मिनिटांनी भारताचे संविधान लागू करण्यात आले. 

- प्रजासत्ताक दिनी राष्ट्रगीतादरम्यान 21 तोफांची सलामी दिली जाते.

- 1955 मध्ये पहिल्यांदाच राजपथावरील परेडमध्ये पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल मलिक गुलाम मोहम्मद मुख्य अतिथी होते.

- पहिल्या प्रजासत्ताक दिनाची परेड मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये झाली होती. 

- भारताचे संविधान जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. ते एका दिवसात वाचून पूर्ण होऊ शकत नाही. 

- भारतीय संविधानात 395 अनुच्छेद आणि 8 अनुसूची आहेत. 

-प्रजासत्ताक दिनी अशोक चक्र आणि किर्ती चक्रसारखे सन्मान दिले जातात. 

-1950 मध्ये पहिल्या प्रजासत्ताक दिनी इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकर्णो मुख्य अतिथी होते.

-आतापर्यंत 1951, 1952, 1953, 1956, 1957, 1959, 1962, 1964, 1966,1967, 1970 साली कोणतेही विदेशी अतिथी उपस्थित नव्हते. यावर्षी कोरोना महामारीमुळे प्रजासत्ताक दिनी प्रमुख अतिथी नसणार आहेत. 

- 2014 मध्ये प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्र सरकारने पहिल्यांदाच मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर परेड आयोजित केली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: why we celebrate Republic Day 2021 know 10 things