योगी अयोध्येतून का लढले नाहीत, रामलल्लाच्या मुख्य पुजाऱ्यांचा खुलासा

योगी आदित्यनाथ मथुरा किंवा अयोध्येतून निवडणूक लढवतील अशी अटकळ बांधली जात होती.
Yogi Adityanath, UP
Yogi Adityanath, UPsakal

गोरखपूर : योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी अयोध्येतून (Ayodhya) निवडणूक न लढवण्याचा निर्णय आपल्या सांगण्यावरून घेतल्याचा खूलासा राम मंदिराचे मुख्य पुजारी (Ram Mandir Chief Priest ) आचार्य सत्येंद्र दास यांनी केला आहे. मंदिराच्या बांधकामामुळे आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे अनेकांची दुकाने आणि घरे पाडली गेली आहेत, यामुळे अनेकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे जर योगींनी आरोध्येतून निवडणूक लढवली असती तर, त्यांना मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले असते. त्यामुळे आपण आदित्यनाथ यांनी गोरखपूरमधून निवडणूक लढवावी, असा सल्ला दिल्याचे दास यांनी स्पष्ट केले आहे. (UP Assembly Election 2022)

Yogi Adityanath, UP
Marital Rape: भारतातील 25 पैकी एक महिला पतीकडून अत्याचाराची बळी

सत्ताधारी भाजप राम (BJP) मंदिराचा मुद्दा सोडणार नसल्याचे सांगत. दास म्हणाले की, "प्रथम राम लल्ला आंदोलन सुरू झाले, त्यानंतर न्यायालयाचा निर्णय आला आणि राम मंदिराचे बांधकाम सुरू झाले. राम मंदिराचा (Ram Mandir) प्रश्न कधीच संपणार नाही. बांधकाम थांबवण्यासाठी कोर्टात अर्ज केला, पण बांधकाम सुरूच असल्याचे ते म्हणाले. दास यांना त्यांच्या हयातीत राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल अशी आशा आहे.

Yogi Adityanath, UP
''नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासाठी पाकिस्तानमधून लॉबिंग''

विशेष म्हणजे योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) मथुरा किंवा अयोध्येतून निवडणूक लढवतील अशी अटकळ बांधली जात होती. तसेच अयोध्येतून निवडणूक (Ayodhya) लढण्याची चर्चा देखील अधिक होती. मात्र पक्षाने त्यांना गोरखपूर (Gorakhpur Assembly ) मतदारसंघातून उमेदवारी दिली. योगी अयोध्या किंवा मथुरेऐवजी गोरखपूरमधून का लढत आहेत, याकडे राजकीय जाणकार वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहत आहेत. दरम्यान, अद्याप सर्वच पक्षांकडून उमेदवारांची घोषणा झालेली नाही, त्यामुळे आता अयोध्येतील निवडणुकांबाबत लगेच बोलणे उचित ठरणार नसल्याचे दास म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com