गर्लफ्रेंडसोबत कारमध्ये सापडला भाजप नेता! बायकोने बघितलं अन्.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

wife caught BJP state minister in car with his girlfriend

गर्लफ्रेंडसोबत कारमध्ये सापडला भाजप नेता! बायकोने बघितलं अन्..

भाजप नेता मोहित सोनकर गर्लफ्रेंडसोबत कारमध्ये रात्री सापडला आणि सगळीकडे गोंधळ उडाला. रात्री कारमध्ये या दोघांचा रोमान्स चाललेला असताना भाजप नेत्याचे आणि त्याच्या गर्लफ्रेंडचे कुटुंबिय त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांना रंगेहाथ पकडले. चपला जोड्यांनी हाणत कुटुंबियांचे प्रचंड भांडण चालले असताना पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. यानंतर दोन्ही कुटुंबियांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. (wife caught BJP state minister in car with his girlfriend)

कानपूरच्या जूही ठाण्याच्या आनंदपूरी पार्कजवळ शनिवारी रात्री भाजप नेता मोहित सोनकरचा त्याच्या गर्लफ्रेंडसोबत कारमध्ये रोमान्स चालला होता. एवढ्यात त्याच्या गर्लफ्रेंडचा पती आणि या भाजप नेत्याची बायको त्यांच्या कुटुंबियांसोबत तेथे पोहोचली. यावेळी भाजप नेत्याच्या बायकोने तिच्या भावांसह मिळून त्याला चपला जोड्यांनी मारत चांगलाच दंगा केला. मात्र यावेळी विशेष म्हणजे बायकोच्या लपून केलेल्या या कृत्यानंतर या भाजप नेत्याने त्याच्या गर्लफ्रेंडच्याच पतीला हाणलं. दोन्हीकडून चाललेल्या हाणामारीनंतर पोलीसांनी दोघांच्याही कुटुबियांना पोलीस ठाण्यात नेलं.

हेही वाचा: Putin Girlfriend Blacklisted : अमेरिकेने केलं पुतिनच्या गर्लफ्रेंडला ब्लॅकलिस्ट, गर्भवती असल्याची चर्चा

मोहित सोनकर कानपूर बुंदेलखंड भागातील क्षेत्रीय मंत्री आहे. भाजप नेता मोहित त्याच्या गर्लफ्रेंडचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पार्कमध्ये भेटले होते. लपत छपत केलेला या दोघांचा प्लॅन मात्र त्यांच्या कुटुंबियांना कळला आणि चांगलाच दंगा झाला. हे सगळं होत असताना लोकांची रस्त्याच्या बाजूला चांगलीच गर्दी जमली होती. तसेच लोकांनी त्यांच्या हाणामारीचा व्हिडिओ बनवत सोशल मीडियावरही वायरल केलाय. भाजप नेत्याने त्याच्या गर्लफ्रेंडच्या नवऱ्याला झोडल्याने तिच्या नवऱ्याने भाजप नेत्याविरोधात पोलीसांत तक्रार दाखल केली आहे.

Web Title: Wife Beat To Bjp State Minister Mohit Sonkar By Slippers As She Caught Him With Girlfriend In Car Police Case File Against Bpj State Minister

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..