
उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे पतीला त्याच्या पत्नीवर संशय आला. त्याने त्याच्या पत्नीच्या मोबाईलवर कॉल रेकॉर्डिंग अॅप डाउनलोड केले. पत्नी स्वयंपाकघरात गेल्यावर पती गुपचूप कॉल रेकॉर्डिंग ऐकू लागला. हे पाहून पत्नीला खूप राग आला. नंतर तिने विचार न करता त्याला लाटण्याने आणि चिमट्याने मारहाण केली. ती एवढ्यावरच थांबली नाही, तिने तिच्या पतीला घराबाहेर हाकलून लावले.