माहेरी गेल्यावर पत्नी राहिली गरोदर; पती म्हणाला...| Crime News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

small child murder
माहेरी गेल्यावर पत्नी राहिली गरोदर; पती म्हणाला...| Crime News

माहेरी गेल्यावर पत्नी राहिली गरोदर; पती म्हणाला...

एका महिलेने आपल्या दीड वर्षाच्या मुलाचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील अनुपपूर जिल्ह्यात घडली आहे. संंबंधित महिला तिच्या माहेरी गेल्यावर गरोदर राहिली असल्याचा आरोप करत बाळाला स्वीकारण्यास पतीने नकार दिला. त्याचबरोबर पतीने मुलाची डीएनए चाचणी करण्याची मागणी केल्यानंतर महिलेने हे पाऊल उचलल्याचं पोलिसांनी गुरुवारी माध्यमांना सांगितले.

ही घटना काही दिवसांपूर्वी जिल्हा मुख्यालयापासून ६० किमी अंतरावर असलेल्या बिजुरी भागात घडल्याचं पोलिसांनी सांगितले. कोटमाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDOP) एसएस बघेल म्हणाले, "रविवारी मध्यरात्रीनंतर 26 वर्षीय महिला तिच्या खोलीतून बाहेर आली. तिचा मुलगा प्रतिसाद देत नसल्याचं तिनं कुटुबीयांना सांगितले. परंतु मुलाच्या नाकातून रक्त येत असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. (The husband said- Test the child's DNA; Wife kills baby)

त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. नातेवाईकांचे जबाब नोंदवल्यानंतर मुलाच्या वडिलांना पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने त्याने मुलाला स्वीकारण्यास नकार दिल्याचे दिसून आले. त्याला मुलाची डीएनए चाचणी करायची होती.बघेल यांनी सांगितले की, जेव्हा महिला तिच्या माहेरी गेली तेव्हा ती गरोदर राहिली, असा आरोप तिच्या पतीने केला आहे.

बघेल म्हणाले की, घटनेचा तपास केल्यानंतर तसेच मुलाच्या मृतदेहाच्या पोस्टमार्टम अहवालात महिलेनेच मुलाचा गळा दाबून खून केल्याचे समोर आले आहे. त्यांनी सांगितले की, संबंधित महिलेविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे.