

uttar pradesh crime
ESakal
प्रत्येक कुटुंबात पती-पत्नीमध्ये छोटी-मोठी भांडण होत असतात. मात्र काही ठिकाणी कौटुंबिक वाद अगदी विकोपाला जाऊन पोहोचतात. उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने तिच्या पतीवर भांडणादरम्यान नाक कापल्याचा आरोप केला आहे. तसेच तिला गटारं फेकले असून या हल्ल्यात तिच्या सासू आणि सासऱ्यांचा देखील समावेश असल्याचे पीडितेने म्हटले आहे.