Video: बायकोने 'त्या' दिवशी सजवला 'असा' बेड अन्...

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 डिसेंबर 2019

पत्नीने नवऱयाचे डोळे बंद केले आणि बेडरूमध्ये नेले. नवऱयाने डोळे उघडल्यानंतर समोरील चित्र पाहिल्यानंतर अवाकच झाला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, बायको असावी तर अशी, अशा प्रतिक्रिया नेटिझन्स देत आहेत.

कोलकाता : पत्नीने नवऱयाचे डोळे बंद केले आणि बेडरूमध्ये नेले. नवऱयाने डोळे उघडल्यानंतर समोरील चित्र पाहिल्यानंतर अवाकच झाला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, बायको असावी तर अशी, अशा प्रतिक्रिया नेटिझन्स देत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱया व्हिडिओमधील पती-पत्नी हे सेलेब्रिटी नाहीत. पण, त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ते प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. शिवाय, सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. पती-पत्नीमधील पवित्र नात्याचा हा व्हिडिओ पाहून नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर हे ठरवून केल्याचे दिसत नाही. एका बंगाली जोडप्याचे निखळ प्रेम यामधून पाहायला मिळत आहे.

बहुतेक बायकोचे प्रेम प्रकरण सुरू आहे...

पत्नी घरातल्या कपड्यांतमध्ये दिसत आहे. बायकोने नवऱ्यासाठी संपूर्ण खोली सजवली आहे. शिवाय, रोमँटिंक गाण्याचा आवाजही येत आहे. कँडललाइटनी सजवलेले हार्ट, गुलाबाची फुलं अशी सगळी तयारी वाढदिवसानिमित्त केलेली पाहायला मिळते. शिवाय, पतीला भेटवस्तूही दिली आहे. नवरा हे सर्व पाहून भारावून गेला आहे. संबंधित व्हिडिओ 83 लाखांहून अधिक जणांनी पाहिला आहे. या आकड्यावरूनच व्हिडिओ किती व्हायरल झाला आहे, हे दिसते.

बास, मी आता जगूच शकत नाही...

प्रेमाच्या माणसाने सरप्राइज गिफ्ट देऊन सुखद धक्का द्यावा, अशी अनेकांची इच्छा असू शकते. मग, ती प्रिय व्यक्ती कोणीही असू शकते. पण, पत्नीने सरप्राइज दिले असेल तर चर्चा होणारच.

पत्नी म्हणाली, तू फक्त नावाला नवरा म्हणून राहा...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wife celebrates husbands birthday surprise romantic gift video