
उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील असमोली पोलीस स्टेशन परिसरातील एका गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जेव्हा पतीने आपल्या पत्नीला तिच्या दाजीसोबत फोनवर बोलू देण्यास नकार दिला तेव्हा भांडण झाले आणि रागाच्या भरात पत्नीने पतीचा गुप्तांग कापून टाकला. आरडाओरडा केला तेव्हा शेजारच्यांनी पतीला तिच्या तावडीतून सोडवले. यानंतर काही वेळातच महिलेनेही अॅसिड प्यायले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.