महिन्याला ५ हजार रुपये हवे; पत्नीची सासरी राण्यासाठी पतीसमोर अट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Husband-Wife

महिन्याला ५ हजार रुपये हवे; पत्नीची सासरी राण्यासाठी पतीसमोर अट

नवी दिल्ली - बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील पोलीस समुपदेशन केंद्रातून पती-पत्नीचे एक प्रकरण समोर आले आहे. जे ऐकून सगळेच थक्क झाले. पतीसोबत सासरच्या घरी राहण्यासाठी पत्नीने ठेवली अशी अट ठेवली की, पोलीस समुपदेशन केंद्राचे सदस्यही अचंबित झाले. (Husband-Wife news in Marathi)

हेही वाचा: नड्डांना संघराज्य पद्धत संपवायची आहे का? - उद्धव ठाकरे

पती आपल्याला दर महिन्याला ५ हजार रुपये देईल तेव्हाच आपण त्याच्यासोबत सासरच्या घरी राहू, अशी अट ठेवली आहे. अशी अट का ठेवली, असे विचारले असता महिलेने सांगितले की, नवरा मला सोडून दिल्ली-पंजाबला पैसा कमावण्यासाठी जातो. मी इथे घर कसे चालवते हे फक्त मलाच माहीत आहे.

महिलेने सांगितले की, मी सासरच्या घरी राहीन पण माझ्या पतीने मला दरमहा 5000 रुपये द्यावे. त्यानंतर पतीनेही पत्नीची ही अट मान्य केली. मात्र पोलिस स्टेशनमधून बाहेर जाण्यापूर्वी पत्नीचे खाते उघडून त्यात पैसे जमा करा तरच मी बाहेर जाईन, असही पत्नीने म्हटलं होतं.

हेही वाचा: काश्मीरमध्ये 30 वर्षांनंतर उघडणार थिएटर्स; पहिल्या मल्टिप्लेक्सचं काम सुरु

पतीने पत्नीच्या खात्यात दर महिन्याला 5000 रुपये पाठवण्याचे आश्वासन दिले. याबाबत दोन्ही पक्षांनी परस्पर संमतीने व आनंदाने पोलीस समुपदेशन केंद्रात बॉण्ड बनवून स्वाक्षरी केली. त्यानंतर पती-पत्नीतील वाद मिटला.

Web Title: Wife Made Condition To Live In Lawas House

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BiharWifewife and husband